Share Now
Read Time:1 Minute, 9 Second
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
कॉंगेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनामुळे मोठा धक्का बसला. एक संवेदनशील माणूस, अभ्यासू-संयमी लोकप्रतिनिधी आणि माझे उत्तम मित्र असलेल्या सातव यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.
संसदेमध्ये त्यांची अनेक अभ्यासू भाषणे गाजली आहेत. सातव यांचा जनसंपर्क खूप मोठा होता. शिवाय अनेक विषयांमध्ये त्यांचा परिपूर्ण अभ्यास असायचा. संसदेत अनेक प्रश्नांना वाचा फोडून, कोणताही मुद्दा मांडताना त्याच्या सर्व पैलूंचा ते विचार करायचे. सातव यांच्या निधनामुळे कॉंग्रेस पक्षाचे आणि माझे वैयक्तिकसुद्धा मोठे नुकसान झाले आहे.
असे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमांना कळविले
Share Now