आता पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर आणि सर्व सवलती जाहीर होण्यासाठी हे करावंच लागेल युवा पत्रकार संघाच्या बैठकीत निर्णय..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

पत्रकारिता परिणामकारक सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी हत्यार आहे पण खुद्द पत्रकार मात्र शासनदरबारी आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी अपयशी असल्याचे दिसून येते.

Advertisements

सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडियाने प्रसार माध्यम सोशल मीडिया यांनी शासन प्रशासनाच्या सर्व बातम्या वर निर्णय होईपर्यंत बहिष्कार घालावा,
व या फ्रंट वर्कर आणि सर्व सवलती मिळण्यासाठी अनेक मंत्री, खासदार, आमदार, सामाजिक संस्था यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे पत्र देऊन मागणी केली.पण शासन पत्रकारांच्या प्रश्ननांनसाठी उदासीन भुमिका घेत आहे. शासनाने त्वरित महत्वाच्या विषयाची संघटनेच्या वरिष्ठ स्तरावर सूचना द्यावी व तत्काळ अंमलबजावणी करावी

शिवाय शासन वठणीवर येण्यासाठी
कारण राज्य व केंद्र सरकार सुद्धा सुप्रीम कोर्टाने फटकारल्या शिवाय तिजोरीतून पैसे बाहेर काढत नाही किंवा जनहिताचे निर्णय घेत नाही म्हणून माननीय कोर्टाने शासनावर ताशेरे ओढत चांगलेच फैलावर घेतले म्हणून

“उठ पत्रकारा उठ
तूच थांबाव तुझी लूट”

आपण ग्राउंड स्तरावर काम करतो उन्ह, वारं पाऊस व थंडीत फिरून बातम्या लावाव्या का? का?? का???यांना का फुकटात प्रसिद्धी द्यावी हा आता प्रश्न पडला आहे.
आता पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर आणि सर्व सवलती जाहीर होण्यासाठी हे करावंच लागेल
पत्रकार एकजूट होऊन राज्यभर आंदोलन करून लढा उभे करू युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या बैठकीत निर्णय.
बैठकीला वरिष्ठ पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, राज्य कार्याध्यक्ष रतन हुलस्वार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जेष्ठ पत्रकार नवाब शेख (इ २४ तास लाईव्ह), कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संदीप शिंदे (दै. महासत्ता), राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी (मिडिया कंट्रोल), आवाज कोल्हापूर चे संपादक राकेश पोलादे, राज्य उपाध्यक्ष बाबूराव वळवडे,(मिरर कोल्हापूर) प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते.

3 thoughts on “आता पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर आणि सर्व सवलती जाहीर होण्यासाठी हे करावंच लागेल युवा पत्रकार संघाच्या बैठकीत निर्णय..”

  1. कर्तव्यदक्ष पोलीस टाइम्स न्यूज

  2. फ्रंट लाईनमुळे कामगार आम्हाला प्रेस रिपोर्टर म्हणून काम करण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळते आणि आम्ही अधिक कार्यक्षमतेने कार्य करू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *