उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटण्यासाठी गर्दी करू नका.

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटण्यासाठी गर्दी करू नका..

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे निवेदन.
गर्दी टाळण्याचे केले आवाहन.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे सोमवारी दि. १४ कोल्हापूर येथे येत आहेत. उपमुख्यमंत्री श्री. पवार व आरोग्यमंत्री श्री. टोपे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
         
पत्रकात श्री. पाटील यांनी पुढे म्हटले आहे, कोल्हापूर जिल्हा कोरोना महामारीच्या संसर्गामध्ये चौथ्या स्तरामध्ये आहे. या परिस्थितीचा आढावा व उपाय योजना संदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार व आरोग्य मंत्री श्री. टोपे हे आज कोल्हापुरात शासकीय बैठकीसाठी येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय व शासकीय विश्रामगृह येथे त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *