कोल्हापूर/प्रतिनिधी
आपली साथ मदतीचा हात हे बिद्र वाक्य घेऊन लगोरी फाउंडेशन गेली चार वर्ष कोल्हापूर मध्ये कार्यरत आहे
लगोरी फोउंडेशन या मातृ संस्थेचे आज पर्यंत पाचशेच्या वर सभासद आहेत, तसेच आज वर लगोरी फाउंडेशनने महिलांना न्याय देऊन अन्यायया विरुद्ध लढा उचलला आहे, आतापर्यंत दहा ते पंधरा संसार पूर्ववत जोडून दिलेले आहे तर ज्या महिलांना शारीरिक मानसिक अत्याचार सामोरे जावं लागतं अशा महिलांसाठी मोफत कायदेशीर मदत, त्याचबरोबर महिलांना मनोरंजन, स्वावलंबन, महिलांमधील विश्वास जागृत करणे, महिलांसाठी विविध स्पर्धा, संक्रांत हळदीकुंकू गौरी-गणपतीचे हळदीकुंकू, सहल, प्रबोधनात्मक सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याच बरोबर महिलांसाठी मोफत काउंसलिंग, टू व्हीलर प्रशिक्षण, पाककला प्रशिक्षण, नवनवीन उद्योगासाठी लागणारे प्रशिक्षण( गाऊन शिवणे.केक प्रशिक्षण )आत्तापर्यंत लगोरीच्या अंतर्गत केलेली आहे, त्याच बरोबर गरजू महिलांना उद्योग देणे, शिलाई मशीनचे वाटप, गरीब असाहाय्य महिलांना साड्या वाटतं, अंध व अपंग मुलांना, आश्रमातील वृद्धांना फळे बिस्किटे, वाटप त्याचबरोबर त्यात कोल्हापूरचा महापुराच्या काळातही जमेल तेवढा शिधा कपडे अगदी पिण्याच्या पाण्याचीही सोय करुन लगोरी फाउंडेशन तर्फे महिलांसाठी आरोग्य शिबिर ही घेण्यात आले आहे, लगोरी फाउंडेशनचा मुख्य हेतु महिला सबलीकरण महिला सक्षमीकरण हाच आहे, उपेक्षित महीलानसाठी सामाजिक भान ठेवून कार्य करताना विषेस समाधान आम्हा सर्वांना होत आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्हात काम करताना उत्साह वाढल्याने आता लगोरी फाउंडेशन महाराष्ट्रभर भरारी घ्यायचा तयारीत आहे.
कोरोना पार्शवभूमी वर लॉकडाउनच्या काळात अनेकांवर संकट आले. लगोरी फाउंडेशन च्या वतीने कोल्हापूर शहर व उपनगरातील कासार (बांगडया)व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रायव्हेट हायस्कूल मंगळवार पेठ येथे जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. बाकी उपनगरा तील कासार व्यवसाय करणाऱ्या महिलांना घरोघरी जाऊन ही मदत पोहच केली, यावेळी संस्थापक अध्यक्ष शुभांगी साखरे, शिवानी यादव अलका सनगर, कल्याणी मेढे-पवार,धनश्री जाधव, निकिता कापसे, दिप्ती जोशी, मंगला काळे, ऐश्वर्या झाजगे, स्मिता खामकर, मेघा दिलवे त्यांच्या योगदानातून हा उपक्रम पार पडला.