रत्नागिरी/प्रतिनिधी: युवा पत्रकार संघाचा कार्यविस्तार संपूर्ण महाराष्ट्रासह कोकण विभागात करण्यासाठी आपण अग्रस्थानी राहून प्रयत्नरत राहू , अशी ग्वाही वृत्तपत्र गुन्हेशोध रत्नागिरी जिल्हाचे पत्रकार दयानंद गणपत निकम यांनी येथे बोलताना दिली .
दयानंद निकम यांची युवा पत्रकार संघाच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संघाचे राज्य उपाध्यक्ष जावेद देवडी यांच्या हस्ते त्यांचा नियुक्तीपत्र व ओळख पत्र देऊन सन्मान करण्यात आला . युवा पत्रकार संघाचे महीला आघाडी राज्य उपाध्यक्ष सौ. मार्था भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या, यूवा पत्रकार संघाचे कायदेविषयक सल्लागार अँड. संदिप पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी दयानंद निकम यांच्या सारखे प्रसारमाध्यम क्षेत्रातील दिग्गज कोकणात व राज्यात देखील संघाचे नाव झळकवतील रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी युवा पत्रकार संघाने दिलेल्या जबाबदारी मनापासून पार पाडतील याची मला खात्री आहे. त्यांचे जनसंपर्क, सखोल अभ्यास, अनेक विषयांचा अनुभव व त्यांच्या कार्य अभिमानास्पद असल्याचे नमूद केले. अशी व्यक्ती युवा पत्रकार संघ परिवाराचा सक्रिय घटक म्हणून पुढे येणे ही बाब युवा पत्रकार संघासाठी गौरवास्पद असल्याचे उदगार त्यांनी काढले.
कोल्हापूरात लवकरच युवा पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना युवा पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष यांनी यावेळी बोलताना केली .
या वेळी प्रदेश उपाध्यक्ष आवाज कोल्हापूर या वृत्तपत्राचे संपादक राकेश पोलादे यानी नुतन रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दयानंद निकम यांनी आम्ही येण्याचे कळताच खेड तालुक्यात आमच्या स्वागतासाठी सकाळ पासून रात्री एक वाजेपर्यंत प्रतिक्षा करत होते त्यांनी जबाबदारी कशी पार पाडायची याची अनुभूती दिल्याचे व आमच्या राहण्याचे नाष्टा जेवणाची उत्तम प्रकारे सोय केल्याची आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी उद्योजक संतोष गुंदेशा, वृषभ गुंदेशा, उपस्थित होते.