कोल्हापूर जिल्ह्यातील २९ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या, १४ पोलीस निरीक्षक व १५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश.

विशेष वृत्त जावेद देवड


कोल्हापूर पोलीस दलातील कार्यकाल पूर्ण केलेल्या तसेच विनंती व नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जारी केले आहेत. १४ पोलीस निरीक्षक व‌ १५ सहाय्यक पोलीस निरीक्षक अशा एकूण २९ पोलिस अधिकाऱ्यांच्या‌ जिल्ह्याअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांची जिल्हा विशेष शाखेकडे बदली करण्यात आली आहे .त्यांच्या जागी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक शशीराज पाटोळे यांची सायबर पोलीस ठाण्याकडे बदली झाली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची पन्हाळा पोलीस ठाण्यात, तर त्यांच्या जागी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांची बदली झाली आहे. नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांची शाहूपुरी पोलीस ठाण्यात बदली वर आले आहेत. पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांची कागलहून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे . मानव संसाधन विभागाकडील पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांची राजारामपुरी पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.
बदल्या झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत – पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव जुना राजवाडा ते स्थानिक गुन्हे अन्वेषण दत्तात्रय नाळे  कागल ते जुना राजवाडा  तानाजी सावंत स्थानिक गुन्हे अन्वेषण ते एलआयबी दत्तात्रय बोरीगिड्डे जयसिंगपूर ते शिरोळ राजेंद्र मस्के ( हुपरी ते जयसिंगपूर शशिराज पाटोळे  एलआयबी ते सायबर सेल  प्रकाश गायकवाड  गडहिंग्लज ते आर्थिक गुन्हे अन्वेषण) अंबरुषी फडतरे  पन्हाळा ते मानव संसाधन 
सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे आजरा ते कुरुंदवाड  दिपक भांडवलकर गांधीनगर ते शाहूपुरी), किरण भोसले  शिरोली एमआयडीसी ते स्थानिक गुन्हे अन्वेषण  शैलेजा पाटील  पन्हाळा ते शाहूवाडी भालचंद्र देशमुख  शाहूवाडी ते शिवाजीनगर  अरविंद कांबळे करवीर ते जुना राजवाडा 
पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक विनंती बदल्या- पोलीस निरीक्षक अरविंद काळे आर्थिक गुन्हे अन्वेषण ते पन्हाळा ईश्वर ओमासे मानव संसाधन ते राजारामपुरी श्रीकृष्ण कटकधोंड शाहूपुरी ते आर्थिक गुन्हे अन्वेषण सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील राधानगरी ते इस्पुर्ली  सत्यराज घुले  स्थानिक गुन्हे अन्वेषण ते गांधीनगर राजेश खाडवे नियंत्रण कक्ष ते शिरोली एमआयडीसी शिवानंद कुंभार शिरोळ ते स्थानिक गुन्हे अन्वेषण सुनील हरुगडे  गडहिंग्लज ते आजरा अंजना फाळके नियंत्रण कक्ष ते लक्ष्मीपुरी  सुरज बनसोडे नियंत्रण कक्ष ते करवीर श्रद्धा आंबले नियंत्रण कक्ष ते महिला कक्ष 
जिल्हयात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांची गावभाग ,इचलकरंजी, अप्पासाहेब कोळी यांची राधानगरी, राजेश गवळी यांची शाहूपुरी , सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांची गडहिंग्लज पोलीस ठाण्यात नियुकती झाली आहे . यातील काही अधिकाऱ्यांनी आज मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *