Sangli: आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी 19 एप्रिलला आठ गुन्हे दाखल

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी दि. 19 एप्रिल रोजी आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाळवा तालुक्यातील शिरटे येथे मोटरसायकल दुचाकीवरून 4 लिटर्सपेक्षा अधिक देशी दारूची वाहतूक केल्याप्रकरणी हणमंत बाबुराव कोळी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून 31 हजार 268 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाळवा तालुक्यातील कामेरी येथे जवळपास पावणेपाच लिटर्स देशी दारू सापडल्याप्रकरणी बंडोपंत हिंदुराव इंगळे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून 1 हजार 402 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जवळपास 4 बल्क लिटर्स दारूप्रकरणी अज्ञाताविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून, ठिकाणावरून 1 हजार 164 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Advertisements

60 लिटर्स ताडी सापडल्याप्रकरणी मुत्तप्पा राजाप्पा यलगर यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून 1 हजार 565 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तासगाव तालुक्यातील आळते येथील वृंदा ढाब्याजवळ साडेचार बल्क लिटर्स दारू आढळल्याप्रकरणी विजय उत्तमराव कदम यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून 1 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

खानापूर तालुक्यात माहुली मायणी रस्त्यावर कॅनॉल पुलावर, माहुली येथे मोटरसायकलवरून 6.75 बल्क लिटर्स देशी दारू वाहतूक प्रकरणी देवदास दिनकर यादव यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून 26 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

खानापूर तालुक्यात विटा मायणी रस्त्यावर संत गाडगेबाबानगर, माहुली येथे मोटरसायकलवरून 8.64 बल्क लिटर्स देशी दारू वाहतूक प्रकरणी शिवराम पांडुरंग जाधव यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून 37 हजार 526 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जत तालुक्यातील कुंभारी येथे जवळपास 3 बल्क लिटर्स देशी दारू सापडल्याप्रकरणी मोहन विलास ऐवळे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून 852 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आचारसंहिता कालावधीत नागरिकांना निदर्शनास येणाऱ्या तक्रारी नोंद करता याव्यात म्हणून तालुका व जिल्हा स्तरावर 24 तास संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. जिल्हा स्तरावरील संनियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0233-2600363 हा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *