Sangli : मतदान केंद्रात मोबाईल फोनच्या वापरास प्रतिबंध – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून, 44 सांगली लोकसभा मतदारसंघात मुक्त व निर्भय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतदान केंद्रात मोबाईल फोन (भ्रमणध्वनी)चा वापर करण्यास प्रतिबंध/मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे दिली.

Advertisements

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे, असे सांगून जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मोबाईल टेलिफोन, आय पॅड, लॅपटॉप किंवा ध्वनीमुद्रण (ऑडिओ) किंवा चित्रीकरण (व्हिडिओ) करू शकणाऱ्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर मतदान केंद्रात करण्यास भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिबंध करण्यात आला आहे. असे केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *