ठाणे येथील श्री महावीर जैन हॉस्पिटलने महाराष्ट्रातील वंचित घटकांतील गरीब,गरजू मुलांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्याची केली सामाजिक संकल्पना .

विशेष प्रतिनिधी : नितीन ढाले

महाराष्ट्रातील जन्मजात हृदयरोग असलेल्या वंचित गरीब गरजू लहान मुलांकारिता एका सामाजिक जाणिवेतून मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्याचा मानस श्री महावीर जैन हॉस्पिटलने केला आहे.

Advertisements

लहान मुलांमध्ये हृदयरोग ही एक गंभीर समस्या आहे आणि बाल मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी हे एक मुख्य कारण आहे. श्री महावीर जैन हॉस्पिटल (एसएमजेएच) ठाणे यांनी हे लक्षात घेऊनच महाराष्ट्रभर जन्मजात हृदयरोग असलेल्या वंचित गरीब गरजू लहान मुलांसाठी मोफत कार्डियाक शस्त्रक्रिया करण्याची घोषणा केली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात, हॉस्पिटल हृदयविकाराच्या जटिल समस्या असलेल्या मुलांसाठी 50 मोफत शस्त्रक्रिया करेल.

हॉस्पिटल लहान मुलांमध्ये हृदयविकाराच्या विविध प्रकारच्या आजारांचा प्रारंभिक टप्प्यावर शोध घेईल जेणेकरून वेळेवर उपचार करता येतील व यामुळे

गरजूंना मोफत शस्त्रक्रिया सुविधा मिळू शकतील याची खात्री करण्यासाठी हॉस्पिटलने महाराष्ट्रभरातील विविध शहरांमध्ये जनजागृती ची मोहीम आयोजित केली आहे.
श्री महावीर जैन रुग्णालयामध्ये कार्डियाक केअर याचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे ज्यात सर्वोत्तम डॉक्टर, तंत्रज्ञ आणि जागतिक दर्जाची उपकरणे आहेत तरी या मुळे समाजातील वंचित,गरीब,गरजूनी याचा लाभ घेण्यासाठी
Visit: https://mahavirjainhospital.in या हॉस्पिटलच्या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *