कोरोना नियमांचे पालन करीत ख्रिस्ती बांधवांचा आज नाताळ

कोल्हापूर : जगाला शांतीचा संदेश देणारे प्रभू येशू यांचा आज जन्मदिवस या उत्सवासाठी कोल्हापूर सज्ज झाले आहे . यानिमित्त ख्रिस्ती बांधवानी जय्यत तयारी केली आहे तर शहरातील सर्वात जुन्या वायल्डर मेमोरियल चर्च सह सर्व चर्चना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून आज शनिवारी उपासना होणार आहे . कोरोना चे सर्व नियम काटेकोर पणे पाळण्यात येणार आहेत
गर्दी टाळण्यासाठी वायल्डर मेमोरियल चर्च मध्ये सकाळी ८.१५ मिनिटापासून दुपारी २ पर्यंत वेगवेगळ्या वेळी भक्ती उपासना होणार आहे. तसेच त्यांचे लाईव्हप्रेक्षेपण ही दाखवण्यात येणार आहे.दरवर्षी नाताळच्या पंधरा दिवस आधी पासूनच चर्च मध्ये वेगवेगळ्या उपासना ,धार्मिक सांस्कृतिक व सेवा उपक्रमांचे आयोजन केले जाते. पण गेल्या वर्षी पासून कोरोना चे निर्बंध असल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येण्यावर मर्यादा घातली आहे. त्यामुळे चर्च मध्ये ख्रिस्ती समजापुरते उपक्रम घेतले जातात.काही चर्च मध्ये प्रभू येशू यांच्या जन्माच्या वेळेचा देखवा मांडला आहे शहरातील वायल्डर मेमोरियल चर्च मध्ये सकाळी पहिली इंग्रजी उपासना होईल. रेव्हरेट जे.ए.हिरवे भक्ती सांगतील यानंतर ९.३० वाजता मराठी उपासना होईल यानंतर रेव्ह. डी बी समुद्रे, सीनाय काळे, अशोक गायकवाड, संदेश देणार आहेत. ब्रह्मपुरी चर्च,ख्राईस्ट चर्च, होली क्रॉस सेंट झेवियर्स चर्च, सेव्हंथडे चर्च, यासह जिल्ह्यातील सर्व चर्च मध्ये उपासना होणार आहे.

दरम्यान नाताळच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत खरेदीला मोठी गर्दी आहे. 

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *