आझादी का अमृत महोत्सव महास्वच्छता मोहिमेत ३ टन कचरा..

कोल्हापूर प्रतिनिधी ता.२५ – आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत शहरातील प्रेक्षणीय स्थळे, वारसा स्थळे या ठिकाणी महास्वच्छता मोहिम राबवून ३ टन कचरा व प्लॅस्टीक उठाव करण्यात आला. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हि महास्वच्छता मोहिम सकाळी ८ ते १० या वेळेत राबविण्यात आली. ही मोहिम महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनखाली राबविण्यात आली.

सदरची स्वच्छता मोहिम महालक्ष्मी मंदीर परिसर, गांधी मैदान परिसर,  रंकाळा परिसर, खासबाग मैदान परिसर, शाहू समाधी स्थळ, पंचगंगा नदीघाट परिसर, शिवाजी विद्यापीठ परिसर, कोटीतीर्थ तलाव परिसर, मध्यवर्ती बसस्थानक परीसर, रेल्वे स्टेशन, न्यू पॅलेज परिसर, टेंबलाईवाडी मंदीर, व्हिल्सन पुल, शास्त्रीनगर ग्राऊंड, बुध्द गार्डन के.एम.टी.वर्कशॉप या परिसरात राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत ३ जेसीबी, ३ डंपर, ४ ट्रॅक्टर ट्रॉली यांच्या सहाय्याने ३ टन कचरा व प्लॅस्टीक उठाव करण्यात आला. स्वच्छता झालेनंतर लगेच त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली.
प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी पंचगंगा घाट, रंकाळा टॉवर, भवानी मंडप, केशवराव भोसले नाटयगृह येथे या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर,  मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, परवाना अधिकारी रामकाटकर, मुख्य अग्निशमन अधिकारी रजिंत चिले, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, नारायण भोसले,एन.एस.पाटील, बाबूराव दबडे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, नगरसचिव सुनिल बिद्रे, प्रशांत पंडीत, विलास साळोखे, स्वच्छता दूत अमित देशपांडे, आवनी संस्था, पंचगंगाघाट संवर्धन समिती, स्वरा फॉऊंडेशन, भूमाता ब्रिगेड, रेड क्रॉस संस्था, वृक्षप्रेमी वेलफेअर, रोटरीक्ल्ब, भोसले फॉऊडेशन, डीओटी विद्यार्थी , शेल्टर असोसिएट्स, थुंकी मुक्त संस्था, क्रिडाई संस्था, व्हाईट आर्मी, संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, डीओटीचे प्राध्यापक, विद्यार्थी व एम.एस.डब्लु चे विद्यार्थी, पवडी व सफाई कर्मचारी यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *