Getting your Trinity Audio player ready...
|
कोहापूर युवा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार मेळावा उत्साहात : सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सखाराम राऊ माने यांचा गौरव
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. जसं तुम्ही पाहता, तसं तुम्हाला दिसतं. त्यामुळे पत्रकारांनी समाजाकडे सकारात्मकदृष्टीने पाहिले पाहिजे. तसेच पत्रकारांनी यापुढेही विश्वाससाहर्ता जोपासावी, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सखाराम राऊ माने यांनी केले. कोहापूर युवा पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र दिनी (१मे) आयोजित पत्रकार मेळाव्यात बोलत होते. हा मेळावा पन्हाळा येथील नेहरू उद्यान येथे उत्साहात पार पडला.
यावेळी पन्हाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रुपाली दडेल, युवानेते रविंद्र दडेल, पन्हाळा तालुका अध्यक्ष भास्कर सोरटे आणि युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे उपस्थित होते.

दरम्यान, सुमारे शासकीय सेवेत सुमारे ३४ वर्षे निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने सेवा केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याचे सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी सखाराम राऊ माने यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते “सन्मानपत्र’ देऊन समस्त पत्रकारांच्या वतीने गौरव करण्यात आला.

यावेळी मान्यवरांसह उपस्थित पत्रकारांनी आपले मनोगत मांडले.

यावेळी युवा पत्रकार संघाचे संस्थापक-अध्यक्ष शिवाजी शिंगे म्हणाले, जिल्ह्यात नवोदित पत्रकरांना योग्य मार्गदर्शक करण्याचं काम जिल्हा माहिती अधिकारी उत्कृष्टरित्या करतात. त्यामुळे जिल्हा माहिती अधिकारी हे नवोदित पत्रकारांचे एकप्रकारचे हेडमास्तर आहेत, असे म्हटल्यास वावगं ठरू नये. माने यांनी कोल्हापूर जिल्ह्यात नव्हेतर सांगलीसह अनेक ठिकाणी त्यांनी चांगल्याप्रकारे कार्य केले आहे. याची दाखल आमच्या युवा पत्रकार संघाने घेतली आहे.

आम्हाला ई-मेल आला की मानसाहेब शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय आम्ही घेतला. याला राज्यातील अनेक पत्रकारांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. त्यामुळे आम्ही त्यांचा प्रथम गौरव करणे हेच आम्हा पत्रकारांचं कर्तव्य आहे, असं समजतो.

या अगोदर दयानंद कांबळे यांनी देखील जिल्हा माहिती अधिकारी असताना अनेक पत्रकारांना सहकार्य केले आहे. कांबळेसाहेब देखील खूप अभ्यासू अधिकारी आहेत. सध्या ते दिल्ली येथे सेवेत आहेत. त्यांनीही युवा पत्रकार संघास खूप मार्गदर्शन केले आहे. तसेच त्यांनीही पत्रकारांना सहकार्य केले आहे. पत्रकार कसा असला पाहिजे, पत्रकार समाजात कसा असावा? तो कुठे चुकतोय, त्याला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.

सखाराम माने साहेब यांनी प्रत्येक पत्रकार यांना आपलंस केले. त्यामुळे पत्रकार आणि माने साहेब यांच्यात एकप्रकारचा जिव्हाळा निर्माण झाला आहे. त्यांनी शासकीय अधिकारी म्हणून कधी अधिकार न गाजवता मैत्रीपूर्णरीत्या पत्रकारांशी वर्तन केले आहे. त्यामुळेच त्यांनी अनेक पत्रकारांशी चांगले संबंध निर्माण केले आहेत.

त्यानंतर माने साहेब म्हणाले, पत्रकार हा जनता आणि लोकशाशन यातील दुवा आहे. मी राज्यात ३४ वर्षे सेवा केली आहे. मला माझ्या जिल्हयात सेवा करायला मिळाली हे भाग्य समजतो. पत्रकारांनी सकारात्मक विचार करावा. पत्रकारांनी आपली पत्रकारिता उज्ज्वल करण्याकरिता पूर्वीच्या पत्रकारितेचा वसा घेतला पाहिजे. पत्रकारांनी अधिधाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करा म्हणजे तुम्हाला चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाबी समजतील. परंतु यासाठी पत्रकारांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.

सध्या सोशल मीडिया हा जेवढा चांगला आहे, तेवढा वाईट आहे. सोशल मीडियाद्वारे वाईट ऐवजी चांगल्या बाबी लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. पत्रकारांनीही सोशल मीडियाकडे चांगल्या दृष्टीने पाहावे. ते सहाय्यभूत माध्यम आहे. पत्रकारांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. आजही पत्रकारांना काही अडीअडचणी असल्यास मी सदैव मदत करीन अथवा त्याबाबत मार्गदर्शन करीन. यावेळी माने यांनी कोहापूर युवा पत्रकार संघाचे आणि पत्रकारांचे आभार मानले.

यावेळी राज्य उपाध्यक्ष:- कबीर हजारी, राज्य उपाध्यक्ष:- रवीसागर हळवणकर ,राज्य कार्याध्यक्ष :- हुलस्वार, महाराष्ट्र राज्य सचिव :-धैर्यशील घाडगे, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख:- जावेद देवडी ,कोल्हापूर जिल्हा सचिव:- शरद माळी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष:- प्रकाश कांबळे ,सांगली जिल्हाध्यक्ष:- संतोष कुरणे, प्रदेशाध्यक्ष:- विजय हुपरीकर, सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष:- शरद गाडे ,राज्य संघटक:- मुबारक मगदूम, करवीर तालुका अध्यक्ष :-संतोष सावंत, करवीर तालुका उपाध्यक्ष :-मुबारक आत्तार, राज्य खजानिस:- नियाज जमादार ,कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष :-कमलाकर सारंग, कोल्हापूर शहराध्यक्ष :-शैलेश माने, राज्य सदस्य संदीप शिंदे, राज्य सदस्य:- रत्नदीप चव्हाण ,दक्ष पोलीस टाइम्सचे:- दिपकसिंह पाटील, साप्ताहिक राम मराठाचे सुशांत पोवार, राज्य सदस्य:- संतोष पवार, गडिंग्लज विभागीय अध्यक्ष:- अशोक मोहिते, राज्य सदस्य:- प्रशांत बुरखे, छायाचित्रकार:- बाळकृष्ण पाटील यांसह युवा पत्रकार संघाचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी सभासद सदस्य आणि हितचिंतक आदी उपस्थित होते.

