इचलकरंजी शहरातील कोकरे मळा परिसरात खुल्या जागेत जुगार क्लब व अवैध व्यवसायाचे प्रकार राजरोसपणे सुरू….

क्राईम रिपोर्टर-मार्था भोसले: इचलकरंजी शहरातील कोकरे मळा परिसरात खुल्या जागेत जुगार क्लब व अवैध व्यवसायाचे प्रकार राजरोसपणेसुरु आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायाचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होत असून यावर तातडीने पोलीस कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

इचलकरंजी शहरातील मटका जुगार क्लब ,गुटखा अशा अनेक अवैध व्यवसायाबरोबरच वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी  पोलीस यंत्रणेने कारवाईच्या माध्यमातून मोठी कंबर कसली आहे. या पोलीस कारवाईचे नागरिकांतून मोठे कौतुक होत आहे.असे असले तरी काही परिसरात अजूनही चोरीछुपे अवैध व्यवसाय सुरु ठेवण्यात आले आहेत. 

याचेच उदाहरण म्हणून कोकरे मळा परिसरात खुल्या जागेत जुगार क्लब व अन्य अवैध व्यवसायाचे प्रकार राजरोसपणे सुरु ठेवून पोलिसांनाच आव्हान दिले जात आहे.

याचाच परिणाम या अवैध व्यवसायाचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने या अवैध व्यवसायावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांतून जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *