Share Now
Read Time:1 Minute, 20 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी: पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरास भेट देऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले.
यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, तहसीलदार अपर्णा मोरे, नृहसिंहवाडीच्या सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे, श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष सदाशिव पुजारी, सचिव संजय पुजारी यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करुन मंदिर परिसराची माहिती दिली.
Share Now