२५ फेब्रुवारीला होणार संपूर्ण महाराष्ट्र ‘लकडाउन बी पॉझिटिव्ह’

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 19 Second

 

दि.१९,लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ हे नेमकं प्रकरण काय आहे हे, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. आता या प्रश्नावर पडदा पडला असून हा अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांचा हा आगामी चित्रपट असून येत्या २५ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभरात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
लकडाऊन बी पॉझिटिव्ह या चित्रपटाला संतोष मांजरेकर यांचे दिग्दर्शन आणि ईष्णव मीडिया यांची निर्मिती आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टी घडल्या आणि त्याचे परिणाम ही आपण पाहिले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात अनेकांची लग्न रखडली आणि अनेकांची झाली पण ते सगळेच जिथे होते तिथे अडकले तर अशाच एका लग्नाची गोष्ट ‘लकडाऊन’ सांगत आहे.
लॉकडाऊनच्या मध्ये एका लग्न घरात नेमकं काय काय घडलं असेल याच चित्रण या चित्रपटात आहे. ज्यात तब्ब्ल १५ नावाजलेले चेहरे एकत्र दिसणार आहेत.

 

या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटाचा सुवर्णकाळ जगलेल्या ‘शुभा खोटे’ यांची मुख्य भूमिका आहे.

या चित्रपटाची गाणी ही सध्या ट्रेंड होत असून, बेधुंद मी हे व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने प्रदर्शित झालेलं गाणं हे तरुणाच्या ओठांवरती थिरकत आहे. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. येत्या २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून केतन महांबरे आणि रवी थोपट या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. चित्रपटाचं छायाचित्र दिग्दर्शन ‘धनंजय कुलकर्णी’ याने केले आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मितीची धुरा स्मिता खरात यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश – विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. . चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली असून चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे. लकडाऊन या चित्रपटाचे ट्रेलर आधीच प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांच्यात संपूर्ण चित्रपट पाहण्याचे उत्कृष्टा लागून राहिली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *