Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी : गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणी मध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते.
विज्ञानाचा उपयोग भावी काळात विविध क्षेत्रात जीवन अधिक सुखकर कसे होईल या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी बनवलेली विविध माॅडेल्स या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. आधुनिक शेती, सौर उर्जा, पवन उर्जा आदी घटकातून मानवाचे जीवन अजून कसे सुखकर होईल याचे काल्पनिक दर्शन विद्यार्थ्यांच्या माॅडेल्स मधून दिसत होते. रेन वाॅटर हार्वेस्टिंग, वाॅटर डिस्पेन्सर, मोटर बोट, पवनचक्की, ज्वालामुखी, स्मार्ट सिटी, ड्रिप इरिगेशन, रोप वे, सोलार सिस्टीम, हायड्रॉलिक सिस्टीम आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी माॅडेल्स बनवली होती. प्रथमेश मगदूम, प्रज्वल कुंभार, भूमी शिंदे, प्रणव बाबन्नावर, पार्थ तावदारे, सर्वेश खोत, जान्हवी पाटील, सानिका पाटील, तुषार पाटील, ओम मगदूम, अथर्व चौगले, कल्पना लोहार आदी विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात भाग घेतला.
संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांनी प्रदर्शनास भेट देऊन मुलांचे कौतुक केले. यावेळी प्रिन्सिपॉल दीपाली जोशी, वर्षा केनवडे उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहिस्ता सय्यद, वैशाली देशमाने, स्वाती चव्हाण, सुभाष इंगळे यांनी परिश्रम घेतले.