कोल्हापूरचा अनिकेत जाधव भारतीय फुटबॉल संघात….!

विशेष वृत्त, अजय शिंगे 

कोल्हापूर/प्रतिनिधी : २१ मार्च पासुन बहरीन येथे भारतीय (वरिष्ठ) संघाचे २ मैत्रीपूर्ण सामने बहरीन (२३ मार्च) बेलारूस (२६ मार्च) या संघाविरुद्ध खेळले जाणार आहेत. या करिता ३८ खेळाडूंची संभाव्य यादी बनवण्यात अली आहे.या मध्ये कोल्हापूरचा खेळाडू अनिकेत जाधव याची निवड झाली आहे . पुण्यात ११ मार्च पासून होणाऱ्या सराव शिबिरातून अंतीम २२ खेळाडूंची निवड होइल व हे खेळाडू बहरीन ला रवाना होतील.

   अनिकेतने २०१७ साली भारतात झालेल्या १७ वर्षाखालील युवा विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते त्यानंतर त्याने इंडियन अॅरोज, जमशेदपुर एफसी पुन्हा इंडियन अॅरोज आणि आता हैदराबाद एफसी संघाकडून खेळत आहे. गोव्यात सुरू असलेल्या आयएसएल लीग स्पर्धेत आपल्या संघाकडून अनिकेतने चमकदार कामगिरी करत संघाला तिसऱ्या स्थानावर आणले आहे.मिडफिल्डर म्हणून चमकदार कामगिरीची दखल भारतीय संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी घेतली त्यांनी अनिकेत ची भारतीय फुटबॉल महासंघाच्या 38 जणांच्या संभाव्य ब्लू टायगर अर्थात भारतीय वरिष्ठ फुटबॉल संघात बिल्डर म्हणून समावेश केला.

   अनिकेतने ब्लॅकबर्न रोव्हर्स या जगातील नामांकित फुटबॉल क्लब मधून व्यवसायिक फुटबॉल चे प्रशिक्षण घेतले आहे यादरम्यान अनेक दिग्गज संघासोबत सामनेही खेळले आहेत अनिकेत वर पश्‍चिम महाराष्ट्रातील तमाम फुटबॉल प्रेम इथून कौतुकाचा वर्षाव होत आहे

कोल्हापूरकर फुटबॉल प्रेम….

संभाव्य ३८ मधून तुझी ही निवड होवो यासाठी कोल्हापूरकरांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या कौशल्याच्या जोरावर अंतिम २२ मध्ये नक्की स्थान मिळवशील हा आमचा विश्वास आहे. जेंव्हा २३ मार्चला भारतीय संघाचा बहरीन सोबत सामना सुरु असेल तेव्हा सुनील छेत्री आणि तुझ्यातील पासिंग बघून आम्हाला जल्लोष करायचा आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *