युक्रेन येथून सुखरूप कोल्हापूर येथे पोहोचलेल्या आर्या चव्हाण हिचे भाजपा कोल्हापूरच्या वतीने स्वागत….!

आकाश वाघमारे कोल्हापूर/प्रतिनिधी दि.५ : युक्रेन आणि रशिया या युद्धामुळे युक्रेन याठिकाणी शिक्षण घेत असलेले भारत देशातील हजारो विद्यार्थी मायदेशी परतत आहेत. युक्रेन याठिकाणी एमबीबीएस शिक्षणासाठी गेलेली कोल्हापूरची कन्या आर्या चव्हाण कोल्हापूर येथे सुखरूप पोचली याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी तीच्या शुक्रवार पेठेतील तीच्या घरी भेट देऊन युक्रेन ते कोल्हापूर असा प्रवास समजून घेतला आणि पुढील शिक्षणासाठी तीला शुभेच्छा दिल्या. 

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून ऑपरेशन गंगा राबवले जात असून यामुळे हजारो विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळत आहे. 

Advertisements

आपले अनुभव सांगताना विद्यार्थिनी आर्या चव्हाण हिने केंद्र सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनमोल सहाय्य लाभले असे सांगत आभार व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामुळे भारतीय म्हणून बाहेरील देशामध्ये लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचे नमूद केले. अशा कठीण प्रसंगी राष्ट्रप्रेम आणि देशाचा तिरंगा ध्वजाचा अभिमान असल्याचे नमूद केले. 

यावेळी आर्या चव्हाण यांच्या आई-वडीलांनी मनोगता मध्ये आपल्या देशामध्ये देखील जास्तीत जास्त मेडिकल कॉलेज निर्माण झाली पाहिजेत अशी आशा व्यक्त केली. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थिनी आर्या चव्हाण हिच्या सोबत फोन द्वारे संवाद साधला. अनेक गोष्टींची माहिती घेत ती सुखरूप घरी पोचल्याबद्दल समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. 

आज याप्रसंगी संदीप कुंभार, दीपक काटकर, दिग्विजय कालेकर, सुनिल पाटील, सिद्धांत भेंडवडे,नितीन चव्हाण, सचिन चव्हाण, राजेंद्र ओतरी, अरविंद सुर्यवंशी, राजू कुंभार, मिलिंद यादव यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *