विशेष वृत्त अजय शिंगे-
कोल्हापूर/प्रतिनिधी दि.५ : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२
आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध बी जी एम स्पोर्ट्स यांच्यात खेळवला गेला हा सामना पाटाकडील तालीम मंडळ ने २-१ अशा गोल फरकाने जिंकला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाटाकडील तालीम मंडळ ने आक्रमक खेळावर भर दिला.
सामन्याच्या सुरुवातीला
पूर्वार्धात पाटाकडील कडून झालेल्या खोलवर चढाईत बी जी एम स्पोर्ट्स चा खेळाडू जखमी झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. पाटाकडील तालीम मंडळ कडून ऋषिकेश मेथे पाटील आणि ओंकार पाटील यांनी वारंवार बी जी एम च्या गोल पोस्ट वर अटॅक केले.
सामन्याच्या१२ व्या मिनिटाला पटाकडील कडून ओंकार पाटिल च्या कॉर्नर किक वर अक्षय पायमाल याने गोल नोंदवत १-०आघाडी घेतली.
पहिल्या हाफ मध्ये बी जी एम कडून संथ खेळ खेळला गेला तर पाटाकडील कडून आक्रमक खेळ झाला . त्यात ओंकार पाटील ने मारलेली फ्री किक पोल ला लागून बाहेर गेली, तर
ऋषीकेश मेथे याच्या पास वर प्रथमेश हेरेकर याने मारलेला फटका पोल ला लागून बाहेर गेला. लागोपाठ गोल च्या सांधी हुकल्या.
बचाव करताना रणजित विचारे कडून दिला गेलेला पास पाटाकडील च्या गोल पोस्ट मध्ये जाणारच इतक्यात पी टी एम चा गोलकीपर विशाल नारायणपुरे ने उत्कृष्टरित्या अडवला.
सामन्याच्या उत्तरार्धात बी जी एम कडून गोल बरोबरीत करण्यासाठी आक्रमक खेळावर भर दिला यामध्ये केवल कांबळे,ओमकार जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला..
तर पाटाकडील तालीम मंडळ कडून आघाडी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
बी जी एम कडून झालेल्या अटॅक मध्ये सामन्याच्या ५५ व्या मिनिटाला केवल कांबळे यांने सिद्धेश साळोखे च्या पास वर गोल नोंदवून सामना १-१ बरोबरीत आणला.
या गोल नंतर सामन्यात चुरस वाढली गेली.
पाटाकडील चे खेळाडू ओमकार जाधव,प्रथमेश हेरेकर , ऋषीकेश मेथे यांनी गोल करायचा संधी गमावल्या.
सामन्यात चुरस वाढली असताना पाटाकडील तालीम मंडळ चा खेळाडू ऋषीकेश याने बी जी एम च्या खेळाडू ला अवैध्य रित्या अडवल्या बद्दल ऋषिकेश ला पिवळे कार्ड दाखवले गेले .
सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना पाटाकडील तालीम मंडळ कडून झालेल्या चढाईत ओमकार जाधव च्या उत्कृष्ट पासवर ऋषिकेश मेथे पाटील याने हेड द्वारे अतिशय सुंदर गोलची नोंद करून सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. या गोल मुळे सामन्याचे चित्र पलटले गेले.
सामन्यात बी जी एम कडून केवल कांबळे,ओमकार जाधव, सिद्धेश साळोखे, गोलकीपर अनिकेत तसेच पाटाकडील तालीम मंडळ कडून ऋषिकेश मेथे पाटील, अक्षय पायमल,ओंकार पाटिल, ओमकार जाधव, रंजीत विचारे, अक्षय मेथे पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन झाले.
आजच्या सामन्याचे वैशिष्टे ठरले ते म्हणजे ऋषिकेश मेथे याचा आक्रमक खेळ आणि बी जी एम स्पोर्ट्स चा जिगरबाज खेळ.