Getting your Trinity Audio player ready...
|
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्यातील हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघासाठी आज सकाळी मतमोजणी सुरु झाली. प्रथम पोस्टल मतदान याची मोजणी सुरु केली आहे. यात कोल्हापूर मतदारसंघातून संजय मंडलिक तर, हातकणंगलेमधून राजू शेट्टी आघाडीवर असल्याचे आढळत आहेत. शिवसेनेचे संजय मंडलिक यांना पहिल्या फेरीत १९ हजार ६८३ मते मिळाली असून ते आघाडीवर आहे.
कोल्हापुरात धक्कादायक निकाल पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे संजय मंडलिक आणि राष्ट्रवादीचे धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांच्यात जोरदार लढत सुरु आहे.
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राबाहेर कडक बंदोबस्त
आहे.
लोकसभेच्या १७व्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कोल्हापूर मतदार संघातील मतमोजणी रमणमळा येथे थोड्याच वेळात सुरू होत आहे.

लोकसभा निवडणुक 2019 47 कोल्हापूर अधिकृत आकडेवारी फेरी 1 :
राष्ट्रवादी धनंजय महाडिक 21453
शिवसेना संजय मंडलिक 41136
वंचित आघाडी अरुणा माळी 3502
पहिल्या फेरी अखेर अधिकृत 19,683 ने संजय मंडलिक आघाडीवर.