IPL २०२२ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर…!

मुंबई/प्रतिनिधी : आयपीएल २०२२ ची सर्वच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. कधी एकदा आयपीएल चालू होतेय, एवढी घाई काहीजणांना झाली आहे. या सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. आणि पहिला सामना हा गतविजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि उपविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. प्लेऑफ फेरीपूर्वी एकूण ७० सामने खेळवले जाणार आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या वेळी डबल हेडर सामने असणार नाहीत. शनिवार आणि रविवारी १२ डबल हेडर सामने होणार आहेत. स्पर्धेतील चार सामने मुंबईतील तीन वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. यानंतर पाचवा सामना पुण्यात होणार आहे. दिवसाचे सामने दुपारी ३.३० वाजता सुरू होतील. तर रात्रीचे सामने संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील.

Advertisements

  स्पर्धेचा अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज हा गेल्या वर्षी जेतेपद पटकावणारा संघ आहे. अशा स्थितीत चेन्नईसमोर विजेतेपद राखण्याचे आव्हान असेल. कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या संघावर सर्वांच्या नजरा राहतील. तसेच यावेळी नव्याने सहभागी झालेल्या दोन नव्या संघांची कामगिरीही पाहण्यासारखी असेल. या स्पर्धेबद्दल चाहते प्रचंड उत्सुक आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमशिवाय ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डी.वाय. पाटील स्टेडियमवर सामने होणार आहेत. तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील गहुंजे स्टेडियमवरही सामने होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *