प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिका सन २०२२-२३ चे नवीन अंदाजपत्रक….!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:28 Minute, 45 Second

कोल्हापूर प्रतिनिधी :

सन 2022  2023 चे अर्थसंकल्पीय अंदाजामधील ठळक बाबी पुढील प्रमाणे :-

प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूरकरिता सन 2022 – 2023 साठी शासनाकडे प्रस्तावित तरतूद  23,70,38,734/- व म.न.पा.कडे प्रस्तावित तरतूद 42,00,00,000/- चे एकत्रित नवीन अंदाजपत्रक अव्वल शिलकेसह  (अव्वल शिल्लक रु. 2,17,24,591/-) रक्कम रुपये 67,87,63,325/- चे सादर करणेत येत असून त्यातील विशेष उल्लेखनीय बाबी  पुढील प्रमाणे आहेत.

  • सेमीइंग्रजी शाळा :- सध्या 17 मनपा प्राथमिक शाळां सेमी इंग्रजी मध्ये सुरु असून जून, 2022 मध्ये नवीन तीन सेमी इंग्रजी मनपा प्राथमिक शाळा सुरु करणेचा मानस आहे. त्यानुसार आवश्यक अर्हताप्राप्त शिक्षक वर्ग तसेच आवश्यक शैक्षणिक साधने, सुविधा   उपलब्ध करणेचा मानस आहे.
  • शैक्षणिकसुविधा :- मनपा शाळांसाठी कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूरच्या स्वमालकीच्या 58 इमारती उपलब्ध करुन       देणेत आलेल्या असून या शाळांमध्ये विद्यार्थ्याना स्वच्छ पिण्याचे पाणी, फर्निचर साहित्य, शैक्षणिक तक्ते, सायन्स साहित्य,           मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
  • लर्निग सुविधा :- सध्या 54 मनपा प्राथमिक शाळांमध्ये ई लर्निग सुविधा उपलब्ध असून सन 2022 – 2023 या शैक्षणिक  वर्षामध्ये उर्वरित सर्व मनपा शाळांना सी.एस.आर.फंडातून ई लर्निग सुविधा (ऍ़न्ड्राईड टिव्ही/प्रोजेक्टर) पुरविणेचा मानस आहे.
  • संगणक:- 58 मनपा प्राथमिक शाळांसाठी यापूर्वी संगणक सुविधा उपलब्ध करुन देणेत आलेल्या असून या शैक्षणिक वर्षामध्ये  आणखीन 25 संगणक पुरविणेचा मानस असून त्यासाठी आवश्यक तरतूद अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित करणेत आलेली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व सी.एस.आर.फंडातून उपलब्ध करणेचा मानस आहे.
  • शिष्यवृत्तीसराव परीक्षा :- मनपा शाळांतील विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बहुसंख्येने यश संपादन करावेत यासाठी  शालेय सराव परींक्षांचे आयोजन करणेत येणार असून येत्या शैक्षणिक वर्षातील इ. 5 वी चे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मनपा शाळांतील बहुसंख्य विद्यार्थी निश्चितच यश संपादन करतील अशी आशा आहे.
  • कोल्हापूरप्रज्ञा शोध परीक्षा :- इयत्ता 1 ली ते 4 थी तील मराठी, ऊर्दू व सेमी इंग्रजी वर्गातील विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आकलन  शक्तीचा विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षण समिती मार्फत गेली दोन वर्ष हा स्तुत्य उपक्रम राबविणेत येत असून

या परीक्षेमूळे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकास होत असलेने दिवसेंदिवस शालेय पटसंख्या वाढीमध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसून येत आहे.

  • विज्ञानप्रदर्शन :- कोल्हापूर शहरातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करणेत येणार आहे. त्यामुळे मनपा शाळांतील विद्यार्थ्याचा विज्ञान प्रकल्प राज्य/राष्ट्रीय स्तरावर निश्चितच सहभागी होऊ शकेल.
  • क्रीडास्पर्धा :- मनपा जिल्हास्तर शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा तसेच मनपा शाळा आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणेत  आलेले असून त्यासाठी आवश्यक तरतूद अंदाजपत्रकामध्ये करणेत आलेली असलेने मनपा शाळांतील विद्यार्थ्यी निश्चितच     शहर/जिल्हा/राज्य/राष्ट्रीय स्तरावर क्रीडा विभागामध्ये उज्वल यश संपादन करील अशी आशा आहे.
  • सांस्कृतिककार्यक्रम :- शहरातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव मिळावा व त्यातूनच भविष्यात कलाकार  निर्माण होणेसाठी मदत व्हावी यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे 26 जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणेत येणार आहे.
  • सी.एस.आर.फंड:- प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूरकडे नवीन सी.एस.आर.फंड खाते सुरु करून जास्तीत  जास्त निधी उपलब्ध करुन शाळा/विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शैक्षणिक/भौतिक सुविधा उपलब्ध करून देणेचा मानस आहे.
  • नाविन्यपुर्णयोजना/उपक्रम :-
  1. शहरस्तरीयदिव्यांग संसाधन कक्ष :- (अंदाजित तरतूद रक्कम रु. 10.00 लाख)

कोल्हापूर शहरांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यासाठीचे संसाधन कक्षाची निर्मिती करून  दिव्यांग विद्यार्थ्यांना जसे अंध व अंशतः  अंध  विद्यार्थ्यासाठी  लो विजन किट, ब्रेलर, ग्राफिक ऑर्गनायझर, ब्रेल मी, रीडिंग पेन, डिजिटल ऑडीओ बुक, टॉकिंग बुक, स्क्रीन रीडर, JAWS सॉफ्टवेअर कर्णबधीर विद्यार्थ्यासाठी Digital Audiomitar, Digital speech Trainer, loop inducation system, Digital Hearing Aid अशा नवनवीन साहित्य साधनाची माहिती देऊन त्याचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण/ महिती देणे. तसेच सध्या मनपा रमाबाई आंबेडकर येथे सुरु असलेल्या फ़िजिओथेरपी कक्षाकडे Tread mill, Tilt table , Ultra sound for physiotherapy , sliding chair for physically challenged, Quadriceps Exercise Table व सेन्सरी गार्डन तयार करण्याची आवश्यकता आहे

त्याचबरोबर शासनच्या विविध कल्याणकारी  योजना, स्वावलंबन कार्ड (UDID) / दिव्यांग प्रमाणपत्र काढताना येणाऱ्या अडचणी बाबतचे निराकरण करणे, 10 वी व 12 वी मधील दिव्यांग विद्यार्थ्याचे परीक्षा फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणीचे संपूर्ण निराकरण करणे, लेखनिक बँकेची निर्मिती करणे.  तसेच एस.टी. प्रवास सवलत पास, रेल्वे प्रवास सवलत पास, मनपाच्या / शासनाच्या विविध शिष्यवृत्ती  व विविध योजनाची माहिती देणे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्याला दैनंदिन जीवन जगताना  येणाऱ्या दैनदिन अडचणीवर मात करता यावी यासाठी व त्यांना विशेष तज्ञ विशेष शिक्षक यांचे टीम कडून संपूर्ण मार्गदर्शन करता येईल यासाठी सदर संसाधन कक्षाची निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे.

  1. राजर्षीछत्रपती शाहू समृध्द शाळा अभियान :- (अंदाजित तरतूद रक्कम रु. 2.75 लाख)

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दि. 21 सप्टेंबर, 1917 रोजी सक्तीच्या शिक्षण कायदा केला. त्याच प्राथमिक शिक्षणाचा वारसा  प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूरने आजतागायत जपलेला आहे. सर्वसामान्य, गोरगरीब कुटूंबातील मुलांकरिता ज्ञानाची कवाडे खुली करुन देवून शिक्षणाची ज्ञानगंगा अशीच वाहती ठेवून त्यांच्या गुणवत्तेत उत्तरोत्तर वाढ व्हावी या दृष्टीने सन    2019 – 2020 या शैक्षणिक वर्षापासून

प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिका

सन 2022  2023 चे नवीन अंदाजपत्रक

शाहू समृध्द शाळा प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूर कार्यक्षेत्रातील  58 म.न.पा.शाळांमध्ये राबविणेत येत आहे.    या अभियान अंतर्गत म.न.पा. शाळांचा भौतिक व गुणात्मक विकास साध्य करणेसाठी  शाळा-शाळांमधून विधायक स्पर्धा निर्माण होवून त्याचा शाळांच्या गुणात्मक विकासात इष्ट परिणाम होवून लोकसहभाग वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

  1. मॉडेलस्कूल :- (अंदाजित तरतूद रक्कम रु. 21.00 लाख)

बदलत्या ज्ीावनशैलीमुळे सर्वांचे शारिरिक कष्ट कमी झाले आहेत. या युगामध्ये शारिरिक, मानसिकदृष्टया सक्षम नागरीक तयार करणे आज आव्हान बनले आहे. तंत्रज्ञानाशिवाय तर पर्याय नाही. माणूस हा बुध्दीवान प्राणी. तो आपल्या बुध्दीच्या जोरावर आजुबाजुचे  वातावरण बदलतो आहे. मात्र या सर्व बदलेल्या जीवनशैलीमुळे माणसाचे शारिरिक कष्ट व शुघ्द मोकळी हवा यापासून

कोसो दूर गेला आहे. मानसिक, शारिरिक व भावनिक  असंतुलन वाढत आहे. त्यादृष्टीने मुलांच्या शारिरिक क्षमता वाढविणे यावरही      लक्ष  केंद्रीत करणे आवश्यक आहे.

भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय भारताचे केंद्रशासन व राज्यशासन यांच्या सामाईक यादीत असल्यामुळे ती त्यांची  सामाईक जबाबदारी ठरते. महापालिका स्थानिक संस्था मोफत शालेय शिक्षणाची जबाबदारी मर्यादित प्रमाणावर पेलत असतात. मा. आयुक्त, कोमनपा यांचे सूचनेनुसार महापालिकेच्या निवडक 10 शाळांचा मॉडेल स्कूल्स बनवण्याच्या दृष्टीकोनातून आराखडा तयार करणेत आलेला असून प्रसंगी समाज सहभाग घेऊन हे उद्दीष्ट साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

  1. सुंदरमाझे हस्ताक्षर अभियान मराठी  इंग्रजी :- (अंदाजित तरतूद रक्कम रु. 2.25 लाख)

मनपा प्राथमिक शाळांतील सर्व विद्यार्थ्यांचे मराठी व इंग्रजी हस्ताक्षर सुंदर /सुवाच्छ होणेसाठी विशेष प्रशिक्षित शिक्षकांमार्फत सर्व मनपा शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देणेत येणार आहे.

  1. भाषाकौशल्य विकास अभियान :- (अंदाजित तरतूद रक्कम रु. 1.00 लाख)
  1. गणितझाले सोपे अभियान :- (अंदाजित तरतूद रक्कम रु. 6.50 लाख)

महानगरपालिका शाळांतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करून गणिताबद्दल वाटणारी अनावश्यक भीती कमीकरणे. दैनंदिन व्यवहारात गणिताचे उपयोजन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे.शिक्षक  प्रशिक्षणाद्वारे गणित अध्यापन अधिकाधिक प्रभावी करणे.संगणक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गणित अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ व आनंददायी करणे.

  1. छ.ताराराणी स्व संरक्षण अभियान (मुलींचेसाठी) :- (अंदाजित तरतूद रक्कम रु. 3.00 लाख)

आजच्या दैनंदिन जीवनामध्ये मुली, महिला यांच्या असुरक्षिततेबाबत नेहमीच चर्चा होत आहे.  अगदी पाच वर्षांच्या  चिमुकल्यांपासून सत्तर वर्षांच्या वृद्धे पर्यंत या समाज कंटकांनी आपली वाईट नजर ठेवली आहे.  या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शाळांमधील मुलींना     स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे.  शालेय विद्यार्थीनीसुद्धा या प्रकाराला बळी पडत आहेत.   शाळेच्या तसेच शाळेत येण्या-जाण्याच्या वाटेवर अनेकदा मुलींना छेड-छाडीला सामोरे जावे लागते.  याचा निश्चितच विद्यार्थीनींच्या शाळा गळती आणि नियमित उपस्थितीवर गंभीर परिणाम होत आहे.  मुली घाबरुन बोलत नाहीत, तसेच शाळेत पाठविणे बंद होईल, शिक्षणापासून वंचित रहावे लागेल या भीतीने विमनस्क असतात.  त्यांचे अध्ययनात लक्ष लागत नाही.

सुदैवाने आपल्या शाहू नगरीत बलात्कार व विनयभंगाचे प्रकार जरी नसले तरी असे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी मुलींना                     स्व-रक्षण प्रशिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे.  स्व-संरक्षणाचे धडे घेतल्यामुळे निश्चितच शालेय विद्यार्थीनींच्या आत्मविश्वासात वाढ होईल.  मुली समाजात घडणाऱ्या या विकृतीला बळी पडणार नाहीत.  तसेच त्या भविष्यात पुढील वाटचाल ठामपणे आणि विश्वासपूर्वक  करु शकतील.

  1. लर्निग सुविधा :- (अंदाजित तरतूद रक्कम रु. 20.00 लाख)

ई लर्निंग सुविधा अंतर्गत सर्व मनपा प्राथमिक शाळांना मनपा फंडातून/सीएसआर फंडातून ऍ़न्ड्राईड टिव्ही पुरविणेचा मानस    आहे.

  1. स्कॉलरशीपपरीक्षा इ. 5 वी :- (अंदाजित तरतूद रक्कम रु. 3.00 लाख)

प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूरमार्फत म्युनिसिपल शाळंातील विद्यार्थ्यांच्या बौध्दिक क्षमतेमध्ये वाढ  होणे, प्रश्नांची काठीण्य पातळी लक्षात येणे आणि शासकिय शिष्यवृत्ती परीक्षेचे तसेच म.न.पा. शिष्यवृत्ती परीक्षेबाबतचे दडपण कमी होणे, कोणतीही अडचण, भिती व कमतरता मनामध्ये न रहाता आनंददायी शिक्षण पध्दतीने शासकिय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये म्युनिसिपल प्राथमिक शाळांचा नावलौकीक वाढावा व शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्व तयारी म्हणून जास्तीत जास्त सराव व्हावा या हेतूने म.न.पा.शाळा मधील विद्यार्थ्यांच्या तीन युनिट टेस्ट, तीन सराव परीक्षा व म.न.पा. शिष्यवृत्ती मुख्य परीक्षा प्रतिवर्षी को.म.न.पा. छ. राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजना अंतर्गत घेणेत येतात.

  1. आशयक्षमता समृध्दी कार्यक्रम अंतर्गत अबॅकस इयत्ता 3 री  6 वी :-

(अंदाजित तरतूद रक्कम रु. 3.50 लाख)

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे वतीने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी  सुरु आहे.  भविष्यामध्ये विद्यार्थी स्पर्धात्मक युगाला सामोरे जाणार आहेत.  त्यादृष्टीने इ. 1 ली पासूनच विद्यार्थ्यांची जडणघडण     व्हावी म्हणून आपण KTS, प्रज्ञाशोध, नवोदय या सारख्या परीक्षांचे आयोजन सुरु केले आहे.  उल्लेखनीय बाब म्हणजे मनपा शाळांतील विद्यार्थ्यांनी इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती मध्ये राज्यस्तरावर आपला दबदबा कायम ठेवला आहे.

मनपा शाळांतील सर्वच विद्यार्थी भविष्याचा वेध घेवून स्पर्धात्मक युगात इतरांच्या तुलनेत एक पाऊल पुढे राहतील यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया.

इ. 3 रीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयाचे आकलन आणि त्या अनुषंगाने आपले मत, विचार, कल्पना लेखी स्वरुपात मांडता याव्यात, त्यांचे लेखन कौशल्य विकसित व्हावे, तसेच इंग्रजी सारख्या विषयाशी मैत्री घट्ट व्हावी आणि वाचन, लेखन, अभिव्यक्ती या कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी आशयक्षमता, समृद्धी कार्यक्रम सर्व मनपा शाळा स्तरावर राबविण्याचे नियोजित आहे. तसेच बालवयात ऍ़बॅकस व  वैदिक गणित पद्धतीचा वापर करुन कमी पायऱ्यांमध्ये गणित सोडविण्याचे तंत्र मुलांना शिकविल्यास संकल्पना स्पष्ट होऊन त्यांच्या तर्कशक्तीमध्ये वाढ होईल याकरिता ही बाब कार्यक्रमामध्ये समाविष्ट करणेत आलेली आहे. त्यासाठी मनपाचे सर्व शिक्षक सहभागी होवून कार्यक्रम यशस्वीपणे राबवतील व अपेक्षित उद्दिष्ट साध्य करतील याची खात्री आहे.

  1. विद्यार्थीविज्ञान (इस्त्रो) शैक्षणिक सहल :- (अंदाजित तरतूद रक्कम रु. 10.00 लाख)

        योजनेचे नांव:- महानगरपालिका शाळेतील इ 5 वी ते 7 वी पर्यतच्या विद्यार्थ्यांची निवड करुन  आयुका / इस्त्रो या ठिकाणी भेट   घडवून आणणे.

संभाव्य तरतुद:- 10.00 लाख

प्रस्तावना :-

        महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा,विज्ञाना विषयी जिज्ञासा, आवड? निर्माण व्हावी या उददेशाने   इ 5 वी ते7 वी मधील निवडक 40 विद्यार्थ्याची निवड करुन त्यांना पुणे येथील आयुका, राजा केळकर विज्ञान संग्रहालय, बेंगलो सेथील विश्वेश्वराया सायन्स लॅब, विक्रमसाराभाई रिसर्च सेंटर थुंबा, केरळ हे अवकाशीय यान उड्डान प्रक्षेपन केंद्र दाखविणे महानगरपालिका  शाळेतील विद्यार्थ्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जाणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यामध्ये इस्त्रो/आयुकासंस्थे बाबतची माहिती देऊन स्पेस सेंटर मधील उड्डान  बाबतची शास्त्रीय तत्वे माहित करुन देणे आजच्या पिढीसाठी महत्वाचे आहे. विद्यार्थ्याच्या मनातील जिज्ञासेला मुर्त स्वरुपात आणण्याचा प्रयत्न करणे.  विज्ञानातील संबोध दृढ करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल.

योजनेचे स्वरुप:-

        महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये इ 1 ली ते 8 वी च्या एकूण 58 शाळा असून उच्च प्राथमिक 51 शाळा आहेत इ 5 वी ते 8 मध्ये शिक्षण घेणारे एकूण 3500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा या उददेशाने इस्त्रो व आयुका भेटीचे आयोजन करणे गरजेचे आहे.

स्पेस शटल मार्फत अवकाशात यानाचे उड्डान कसे केले जाते याची शास्त्रीय माहिती मुलांना मिळणे गरजेचे आहे. अंतर्गत सन  2022-23 मध्ये महानगरपालिका स्वनिधी मध्ये इस्त्रोभेटीसाठी आर्थिकतरतुद 10.00 लाख मंजूर केली तर महानगरपालिका शाळातून 40 विद्यार्थीची  (20 मुले + 20 मुली ) निवड केली जाईल.

  1. शाळास्तरमहानगरपालिका शाळातील 5 वी ते 7 वी मधील प्रत्येक इयत्तेतील 10 विद्यार्थ्याची निवड केली जाईल. निबंधाचे विषय  एक आठवडा अगोदर त्या त्या शाळा मुख्याध्यापक  यांना देणेत आल्यानंतर सदर परीक्षाही मुख्याध्यापक यांच्या नियंत्रणाखाली पारदर्शक पध्दतीने  पार पाडण्यात आली. प्रत्येक तुकडीतील 5 विद्यार्थी निवडले जातील.
  2. मनपास्तर:-शाळा स्तरावर निवड झालेल्या विदयार्थ्याची मनपास्तरावर कार्यालय निबंधाचे विषय देऊन परीक्षा घेऊन  अंतिम मुलाखतीसाठी  120 विद्यार्थी निवडले जातील. निबंध स्पर्धेचे विषय स्पर्धा सुरु होणेपुर्वी  10 मिनिटे अगोदर देणेत येतील. वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता,  जिज्ञासा, नाविन्यता यावर आधारितही स्पर्धा घेण्यात येईल. सदर परीक्षाही प्रशासनाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पारदर्शक पध्दतीने पारपाडण्यात येईल. प्रशासनाधिकारी यांनी स्वतंत्र कमिटीतयार करुन त्याच दिवशी निबंध तपासून प्रत्येक इयत्तेतील प्रथम  40  क्रमांकांची निवड करतील. प्रत्येक इयत्तेत 50 %  विद्यार्थीनी असाव्यात.
  3. अंतिममुलाखत :- निवड झालेल्या 120 (60 मुले + 60 मुली )  विद्यार्थ्याची जिल्हास्तरावर मुलाखत घेणेत येईल. सदर मुलाखत Activity Besed स्वरुपाची होईल. यामध्ये प्रामुख्याने खालील प्रकारचे प्रश्न असतील.

अं.क्र

तपशील गुण
1 संकल्पना  स्पष्ट करणे 10 गुण
2 असेका ? 10 गुण
3 कायहोईल ? 10 गुण
4 विज्ञान  विषयक सामान्य ज्ञान 10 गुण
5 वैज्ञानिक दृष्टिकोन 10 गुण
एकूण 50 गुण

 

मुलाखतीसाठी तीन गटामध्ये वाजी विद्यापीठामार्फत घेणेत येतील. सदर मुलाखतीमधुन गुणानुक्रमे 15 मुले व 15 मुली यांची  निवड केली जाईल. सहा विद्यार्थी प्रतिक्षा यादीमध्ये ठेवणेत येतील. निवड  झालेल्या विद्यार्थ्याची वैद्यकिय चाचणी करणेत येईल.

उर्वरित 10 विद्यार्थी सन 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे अंतर्गत इयत्ता 5 वी मधील शिष्यवृत्ती गुणवत्तेनुसार घेणेत  येतील.

योजनेसाठी लागणारी आर्थिक तरतुद

कोल्हापूर – पुणे –  ट्रॅव्हल प्रवास  व पुणेते तिरुअनंतपुरम विमाणप्रवास तसेच परतीचा प्रवास तिरुअनंतपुरम -पुणे- विमाण प्रवास व      पुणे-कोल्हापूर ट्रॅव्हल प्रवास ,निवास व भोजन व्यवस्था तसेच इतर अनुषंगीक खर्च या करिता 10.00 लाख निधी खर्च करण?       आवश्यक आहे.

सभाव्य खर्च आराखडा सन 2022  2023

अं.क्र तपशील रक्कम
1 मनपास्तरावर इस्त्रो भेटीसाठी विद्यार्थी निवड करणेसाठी , निबंध  स्पर्धा घेणे प्रत्येक गटानां को-या उत्तर पत्रिका पुरविणे, निबंध तपासणे, गुणानुक्रमे विद्यार्थ्याची निवड करणेस्पर्धेसाठी अनुषंगीक साहित्य देणे. 5,000/-
2 मनपास्तर मुलाखत, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी यांना चहा व अल्पोपहार तसेच विज्ञान प्रयोगा संबधीचे साहित्य 25,000/-
3 विद्यार्थ्यासाठी आयुका/इस्त्रो या बाबतची माहिती देणे या करिता एक दिवसीय कार्यशाळा घेणे 20,000/-
4 कोल्हापूरते तिरुअनंतपुरम भेटी पुर्वी पुर्व नियोजनासाठी भेट 40,000/-
5 ब्लेझर, कॅप, दैनदिन गरजेच्या वस्तु यांचे किट व कोल्हापूरते पुणे – बेंगलोर – तिरुअंनतपुरम व परतीचा प्रवास तीन दिवस मुक्कम व चार दिवसाचा भोजन व अनुशंगिक खर्च ई-निविदा प्रसिध्द करणे ट्रॅव्हल व विमान प्रवास 9,10,000/-
  एकुण 10,00,000/-

 

  1. अनिवासीक्रीडा स्पर्धा :- (अंदाजित तरतूद रक्कम रु. 5.00 लाख)

SaaLa : मनपा गुरुवर्य आबासोा सासने विद्यामंदिर

pattaa : सासने मैदान, ताराबाई पार्क, कोल्हापूर.

वरील सर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पाडणेकरिता प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूर चे सन 2021 – 2022 चे सुधारीत व सन 2022 – 2023 चे नवीन अर्थसंकल्पीय अंदाज एकूण रुपये रुपये 67,87,63,325/- इतके तयार करणेत आलेले आहे.

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *