गोमटेश मध्ये महिला दिन साजरा….!

विशेष प्रतिनिधी अक्षय खोत :

निपाणी : गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणी मध्ये महिलादिनाचे औचित्य साधून हायस्कूलच्या विद्यार्थिनींसाठी ‘महिलांचे आरोग्य आणि घ्यायची काळजी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख वक्त्या म्हणून महेश एज्युकेशन इन्स्टिटय़ूट निपाणीच्या प्रा. प्रांजली ढेकणे उपस्थित होत्या.

Advertisements

प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक वैशाली देशमाने यांनी केले. आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मुलींनी किशोर अवस्थेत पदार्पण करताना होणारे शारीरीक, मानसिक बदलांना सामोरे जाताना कसे आचरण ठेवावे. दररोज आहार काय घ्यावा. योगा, ध्यान यांचा आपल्या जीवनावर कसा सकारात्मक प्रभाव पडतो. याचे सखोल मार्गदर्शन प्रा. ढेकणे यांनी केले.

सुरूवातीला उपाध्यक्ष उदय पाटील यांनी सर्व महिला शिक्षिकांना पुष्प देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांची ओळख प्रिन्सिपॉल दीपाली जोशी यांनी करून दिली आभार प्रिन्सिपॉल ज्योती हरदी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा केनवडे यांनी केले.

या कार्यक्रमास हायस्कूलच्या सर्व विद्यार्थीनी आणि शिक्षीका उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *