महावितरणच्या अपर्णा महाडीक रोलबॉलच्या प्रशिक्षक…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 26 Second

रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी : महावितरणच्या पन्हाळा उपविभागात उच्चस्तर लिपिक (लेखा) या पदावर खेळाडू प्रवर्गातून कार्यरत सौ.अपर्णा महाडीक यांनी रोलबॉल खेळाच्या प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले आहे. नुकतेच त्यांनी भारतीय खेळ प्राधिकरणाकडून पटियाला येथील नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय क्रीडा संस्थेत प्रशिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्रातून प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या त्या एकमेव महिला खेळाडू आहेत.

पुणे येथे रोलबॉल हा खेळ १९ वर्षांपूर्वी सुरु झाला. आजघडीला जगातील ६३ देशामध्ये तो खेळला जातो. अद्यापपर्यंत रोलबॉलचे ५ विश्वचषक झाले आहेत. या खेळाचे जनक श्री. राजू दाभाडे हे आहेत. दिवसेंदिवस या खेळाची लोकप्रियता वाढत चालली आहे.

भारतीय खेळ प्राधिकरण यांचे अंतर्गत दि.२१ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२२ या कालावधीत नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय क्रीडा संस्था, पटियाला येथे संचालक मा. डॉ. आय. पी. नागी यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने रोलबॉल खेळाचे प्रथमच प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पार पडले.

या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातून रोहन दाभाडे, अनिकेत शिरसाट व सौ. अपर्णा महाडीक या तीन जणांची निवड झाली. सौ.अपर्णा विनय महाडीक या पन्हाळा येथील रहिवासी आहेत. त्यांना कोल्हापूर जिल्हा रोलबॉल असोसिएशनचे सचिव अमित पाटील याचे प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल सौ.अपर्णा महाडीक यांचे महावितरणचे मुख्य अभियंता श्री. परेश भागवत,अधीक्षक अभियंता श्री.अंकुर कावळे यांनी कौतुक केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *