पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ सामना बरोबरीत….!

विशेष वृत्त अजय शिंगे 

कोल्हापूर/प्रतिनिधी : दि.९ : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२.आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात खेळवला गेला हा सामना १-१ असा बरोबरीत राहिला.

Advertisements

सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाटाकडील तालीम मंडळ व खंडोबा तालीम मंडळ यांनी आक्रमक खेळावर भर दिला.

पूर्वार्धात खंडोबा तालीम मंडळ कडून झालेल्या आक्रमक चढाईत सामन्याचा ७ व्या मिनिटाला श्रीधर परब याने गोल नोंदवत खंडोबा तालीम मंडळ ला सामन्याच्या सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली . यानंतर पाटाकडील तालीम मंडळ कडून गोल ची परतफेड करण्यासाठी ऋषिकेश मेथे पाटील आणि ओंकार पाटील यांनी वारंवार खंडोबाच्या गोल पोस्ट वर अटॅक केले. पण गोल करण्यात यशस्वी झाले नाहीत. ऋषिकेश मेथे, प्रथमेश हेरेकर, रोहित पोवार यांनी गोल करायच्या संधी गमवल्या. तर खंडोबा तालीम मंडळ कडून उत्कृष्ठ पासींग व बचावात्मक खेळ पाहायला मिळाला. पहिल्या हाफ पर्यंत खंडोबा तालीम मंडळ १-० ने आघाडीवर होते.

सामन्याच्या उत्तरार्धात पाटाकडील तालीम मंडळ कडून गोल बरोबरीत करण्यासाठी आक्रमक खेळावर भर दिला यामध्ये ऋषिकेश यांनी आक्रमक पवित्रा घेतला..तर खंडोबा तालीम मंडळ कडून बचावात्मक खेळ सुरू झाला.पाटाकडील तालीम मंडळ वारीवर खंडोबाच्या गोल पोस्टवर हल्ले सुरू झाले. या आक्रमक खेळात पाटाकडील चा खेळाडू रोहित पवार यांनी लागोपाठ दोन सोप्या संधी वाया घालवल्या. सामन्यात पुर्ण तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पाटाकडील तालीम मंडळ गोल करण्यासाठी काऊंटर अटॅक करत होते तर खंडोबा तालीम मंडळ बचावात्मक पवित्रा घेऊन पाटाकडीलचे काऊंटर अटॅक रोखत होते. ऋषिकेश मेथे याचे हल्ले सुरू होते त्याने हेड द्वारे मारलेला फटका पोल वर लागून बाहेर गेला. सामना संपणार आणि पाटाकडील तालीम मंडळ हरणार अशी परिस्थिती असतानाच सामन्याच्या अतिरिक्त वेळेत मिळाले फ्री केक वर अक्षय मेथे याचा उत्कृष्ट पासवर ऋषिकेश मेथे याने हे द्वारे उत्कृष्ट गोल नोंदवत सामना बरोबरीत आणला.

सामन्यात खंडोबा तालीम मंडळ कडून श्रीधर परब प्रभू पोवार, सागर पोवार, गोलकीपर आकाश मेस्त्री तसेच पाटाकडील तालीम मंडळ कडून ऋषिकेश मेथे पाटील, अक्षय पायमल, रोहित देसाई, ओमकार जाधव, अक्षय मेथे पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन झाले.

आजच्या सामन्याचे वैशिष्टे ठरले ते म्हणजे ऋषिकेश मेथे याचा जिगरबाज व आक्रमक खेळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांचा सुंदर असा नियोनबध्द पसींग खेळ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *