कोल्हापूर/प्रतिनिधी: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यात विविध ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह येथे महिलांची कार्यशाळा आणि महिलांचा सन्मान असा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांना सन्मानित केले तसेच महिला दिनाची औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यात महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी ईशा देसाई आणि कोल्हापूर जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी साक्षी अतिग्रे यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना संस्थापक अध्यक्ष यांनी नियुक्ती पत्र ओळख पत्र देऊन संघामध्ये त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.महिला दिनानिमित्त महिलांसाठी आयोजित कार्यशाळेमध्ये बोलताना संस्थापक अध्यक्ष यांनी महिलांनी समाजात पुढे येऊन कोणत्या पद्धतीने कार्य केले पाहिजे पत्रकार म्हणून आपली भूमिका काय असेल तसेच पुढील कार्यक्रमाबद्दल सूचना देण्यात आल्या यावेळी
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे राज्य महिला राज्य अध्यक्ष अर्चना चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष मार्था भोसले,राज्य सरचिटणीस अजय शिंगे, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष रवीना पाटील, कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष ईशा देसाई, कोल्हापूर जिल्हा महिला कार्याध्यक्ष साक्षी अतिग्रे, महाराष्ट्र महिला संघटक ज्योती खोचरे, व सभासद पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.