Pune: भारत निवडणूक आयोगाच्या वेबपोर्टलवर लोकसभेचा निकाल उपलब्ध

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक-2019 च्या गुरूवार दि.23 मे 2019 रोजी होणाऱ्या देशभरातील मतदारसंघांचा निवडणूक मतमोजणीचा निकाल व फेरीनिहाय कौल थेट आपल्यापर्यंत आणला आहे. यासाठी आपणास भारत निवडणूक आयोगाच्या https://results.eci.gov.in या वेबपोर्टलवर संपर्क साधावा लागेल.

हे पोर्टल मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वा. सक्रिय होईल. तसेच आयोगाने तयार केलेल्या Voter Helpline हा ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घेवून सुध्दा आपण देशातल्या कोणत्याही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा कौल आणि निकालाची माहिती घेवू शकता. या सुविधेचा आपण अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *