नगररचना विभागाकडून ५६ बांधकाम परवानग्या, २८ भोगवटा प्रमाणपत्र, ९ विभाजन व ११ मुदतवाढ

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 32 Second

रविना पाटील, कोल्हापूर/प्रतिनिधी : नगररचना विभागामार्फत गुरुवारी ५६ बांधकाम परवानग्या, २८ भोगवटा प्रमाणपत्र, ९ विभाजन, ११ बांधकाम परवानगींना मुदवाढ व ४ अनामत रक्कम परत करण्यात आल्या. या कॅम्पमध्ये भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम मागणी अर्ज, ले आऊट मंजूरी, एकत्रीकरण व विभाजनबाबतची प्रकरणे मंजूर करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील दाखल झालेल्या विकास परवानगी (इमारत बांधकाम व भोगवटा) कामी नगररचना विभागामार्फत तीन दिवसाचे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

नगररचना विभागामार्फत तीन दिवसात १७७ बांधकाम परवानग्या, ८२ भोगवटा प्रमाणपत्र, ३३  विभाजन, २४ बांधकाम परवानगींना मुदतवाढ व १४  अनामत रक्कम परत करण्यात आल्या.

या कॅम्पमध्ये सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, हर्षजीत घाटगे व कनिष्ठ अभियंता यांनी दाखल झालेल प्रकरणे तपासून मंजूर केली. या कॅम्पला नागरिक व आर्किटेक्चर यांचेकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *