Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत केली, महाविकास आघाडीकडून बिनविरोध करण्यासाठी मला विनंती करण्यात आली, मात्र ही विनंती मी धुडकावली असून भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा आज शुक्रवारी रात्री होणार आहे यासाठी माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांची नावे भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवण्यात आली आहेत, यामधील सत्यजित कदम यांच्या नावाला भाजपकडून पसंती देण्यात आली आहे मात्र उमेदवारीचा निर्णय भाजप केंद्रीय पार्लमेंट बोर्ड घेणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या, भाजप पक्षाशी आणि आरएसएसशी त्यांचे जवळचे संबंध आहेत, जाधव यांचे भाऊ संभाजी जाधव हे देखील भाजप कडूनच नगरसेवक होते त्यामुळे जयश्री चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसकडून निवडणूक न लढवता भाजपकडून लढवायला हवी होती असेही पाटील यावेळी म्हणाले.
सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढण्याच, करुणा मुंडे यांनी जाहीर केलं होतं मात्र कोल्हापूर उत्तरची निवडणूक करुणा मुंडे लढवणार असल्याने हे आश्चर्य असून भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, कोल्हापूरात येणार आहेत तसेच भाजप उमेदवाराचा अर्ज २३ मार्च रोजी भरणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.