Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. २९ : आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी दिनानिमित्त तृतीय पंथीयांसाठी शुक्रवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदार नोंदणीच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.
तृतीय पंथीयांचे मतदार नोंदणीबाबतचे शिबीर उपविभागीय अधिकारी कार्यालय करवीर, निवडणूक शाखा, कोल्हापूर येथे होणार असून याचा लाभ मतदार म्हणून नोंद नसलेल्या सर्व तृतीय पंथीयांनी घ्यावा. या दिवशी मतदार म्हणून नाव नोंदविण्याकरिता पत्याचा पुरावा तसेच वयाचा पुरावा उपलब्ध नसल्यास नमुना अर्ज ६ मधील जोडपत्र २ व ३ भरून एका रंगीत छायाचित्रासह अर्ज स्विकारले जाणार आहेत.
राज्याचे मुख्यर निवडणूक अधिकारी यांच्या दिनांक १७ मार्च २०२२ च्या पत्रान्वये दिनांक ३१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून साजरा केला जातो. या आदेशाप्रमाणे दिनांक 27 मार्च ते 2 एप्रिल हा तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह म्हणून साजरा करुन त्या अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.