Share Now
Read Time:1 Minute, 14 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.९ : २७६ – कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक १२ एप्रिल २०२२ रोजी होत असून मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून मतदारांनी आपला मताधिकार बजावून या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
एक सुदृढ लोकशाही बनवण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी मतदान करावे. कोल्हापूर जिल्ह्याची मतदानाची आजवरची आकडेवारी पाहता पूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नेहमीच विक्रमी संख्येने मतदान होते. या पोट निवडणुकीमध्ये देखील विक्रमी संख्येने मतदान करुन मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले आहे.
Share Now