Share Now
Read Time:1 Minute, 10 Second
सातारा/प्रतिनिधी : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रोमहर्षक सामन्यात कोल्हापूरचा पुत्र पै. पृथ्वीराज पाटील याने ५-४ अशा गुणाने ही लढत जिंकून महाराष्ट्र केसरी ची गदा आपल्या नावावर केली.अंतिम सामना पहण्यासाठी छत्रपती शाहु क्रीडासंकुलात हजारो प्रेक्षक उपस्थित होते.महाराष्ट्र केसरी साठी सोलापूरचा विशाल बनकर आणि कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यांच्यात हि लढत झाली.लढतीत पहिला विशाल ने पृथ्वीराज वर ४ गुणांची आघाडी घेतली होती.
पण पिछाडीवरून आघाडी घेत पृथ्वीराज ने ५ गुणांची कमाई करत विजयी मिळवली.काळजाचा थरकाप उडवणारी लढत आज प्रेक्षकांना पाहायला मिळाली
Share Now