मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट हि अराजकीय होती. त्यामुळे माझ्याबाबत होणारी भाजप प्रवेशाची चर्चा निराधार आहे, असा खुलासा राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
माजी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन देण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. या महत्त्वाच्या कारणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण, मंगळवारी रात्री भेट घेऊन चर्चा केली. भिमा साखर कारखान्याचा अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्र्यांशी झालेली ही भेट पूर्वनियोजित होती. राज्यातील अनेक साखर कारखान्यांचे अध्यक्ष या चर्चेसाठी उपस्थित होते.
या बैठकीत साखर कारखानदारीसमोरील अडचणी-आव्हानं आणि त्यावरील उपाययोजना यावर ऊहापोह झाला. मात्र, या भेटीचा संदर्भ भाजप प्रवेशाबरोबर जोडणे अयोग्य ठरेल. आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त निराधार आहे, असा खुलासा राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.