मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – पत्रकारांचे सामाजिक हित जपणारे आणि नि:पक्ष, निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ‘मिडिया कंट्रोल’चे मुख्य संपादक शिवाजी शिंगे यांना ‘आदर्श संपादक पुरस्कार’ देऊन गोवा (राज्य) येथे सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत त्यांनी केलेल्या पत्रकारितेची दाखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार वितरण सोहळा गोवा राज्यातील कला अकादमी केंद्रात देशभरातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.

भारतीय हूमॅनीटी अकॅडमी रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट फोर युथ भारतीय कोल्हापूर यांच्या वतीने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित मान्यवारांच्या हस्ते ‘मिडिया कंट्रोल’च्या विषेश अंकाचेही प्रकाशन करण्यात आले.

यावेळी गोव्याचे मंत्री श्रीपाद नाईक पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे धनाजी कराडे, अध्यक्षा स्वाती कराडे,सेक्रेटरी सुषमा रूकडीकर संचालक. व्यवस्थापक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भारतीय हूमॅनीटी अकॅडमी रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट फोर युथ भारतीय कोल्हापूर यांच्या वतीने देशभरातील पत्रकार,संपादक आदींना मान्यवारांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.

यावेळी नि:पक्ष, निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार, संपादक यांच्या कार्याची दाखल घेण्यास भारतीय हूमॅनीटी अकॅडमी रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट फोर युथ भारतीय कोल्हापूर यांच्यासारखा संस्था देशभरात आहेत, याची जाणीव झाली. त्यामुळे पत्रकार, संपादक यांच्यासह पत्रकारिता करणाऱ्यांनी नि:पक्ष, निर्भीड पत्रकारिता करण्यावर अधिक भर देण्यासाठी यानिमित्ताने प्रोहत्सान मिळत असल्याबाबतची प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारणाऱ्या सत्कारमूर्ती तसेच गुणवंतांनी दिली. तसेच भारतीय हूमॅनीटी अकॅडमी रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट फोर युथ भारतीय कोल्हापूरच्या वाटचालीस शुभेच्छाही त्यांनी दिल्या.