केएम चषक चॅम्पियन फुटबॉल स्पर्धेेच्या अंतिम सामन्याला उपस्थितीत प्रेक्षकांना भरघोस बक्षिससे जिंकण्याची संधी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२९ : कोल्हापुरात सुरू असलेल्या केएम चषक चॅम्पियन फुटबॉल स्पर्धेची चुरस आता शिगेला पोहोचली. अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार आणि केएम चषकावर कोणता संघ आपले नाव कोरणार, याबाबत फुटबॉलप्रेमींमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे शुक्रवार, २९ एप्रिल रोजी होणार्‍या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला फुटबॉलप्रेमी प्रेक्षक गर्दी करणार, हे निश्‍चित आहे. या पार्श्‍वभूमीवर अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी आणि उपस्थित प्रेक्षकांना फुटबॉलचा सामना पाहण्याबरोबरच आकर्षक बक्षिसेही जिंकता यावीत, यासाठी संयोजकांच्यावतीने भाग्यवान प्रेक्षक लकी ड्रॉ स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यानुसार अंतिम सामन्याला उपस्थित राहणार्‍या प्रेक्षकांच्या तिकिटांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यासाठी सामन्याला उपस्थिती लावणार्‍या प्रेक्षकांनी तिकीटावरील क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे.

त्यानंतर आपली माहिती भरून ती मोबाईलवरूनच सेंड करायची आहे. त्यातून भाग्यवान विजेत्याची निवड केली जाणार असून, विजेत्यांना टिव्ही, वॉशिंग मशिन, फ्रीज अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे बी इंटरनेटचे एक महिन्याचे फ्री वायफाय कुपन, मिरची हॉटेल मध्ये डिस्काऊंट कुपन, क्रीश महाडिक स्टोअर मध्ये खरेदीवर डिस्काऊंट कुपन आणि क्रीम स्टोन या आईस्क्रीम दुकानात खरेदीवर सवलत, अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. बक्षिसे जिंकण्यासाठी प्रेक्षकांनी अंतिम सामन्याची तिकीट जपून ठेवून, त्यावरील क्यूआर कोड स्कॅन करावा, असे आवाहन पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्यासह स्पर्धेच्या संयोजकांनी केले आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *