Getting your Trinity Audio player ready...
|
क्राईम रिपोर्टर : जावेद देवडी
कोल्हापूर प्रतिनिधी दि.०२ : शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ३०/०४/२०२२ रोजी दुपारी १.३० वाचे सुमारास रुईकर कॉलनी येथे गणपती मंदीर परिसरात फिर्यादी सौ विणा सुहास पाटील वय ४६ रा. रुईकर कॉलनी कोल्हापूर या फिरावयास गेल्या असता त्यांचे गळयातील सोन्याचे १ तोळा वजनाचे मनी मंगळसुत्र हे एका मोटर सायकलवरुन आलेल्या अज्ञात चोरटयाचे जबरदस्तीने हिसडा मारुन चोरुन नेले बाबत शाहुपूरी पोलीस ठाणेस गु.नं ३४२/२० २२ भादंविस कलम ३९२ प्रमाणे दिनांक ३०/०४/२०२२ रोजी गुन्हा दाखल करणेत आला होता.सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणणे करीता मा. पोलीस अधिक्षक सो, कोल्हापूर व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांनी सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे शाहुपूरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांचे मार्गदर्शनाखाली शाहुपूरी पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार सदर गुन्हयाचा तपास करत होते. सदर गुन्हयाचा तपास सुरु असताना गुन्हे शोध पथकास गोपणीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, दिनांक ३०/०४/२२ रोजी रुईकर कॉलनी येथे मंगळसुत्र
चोरी करणारा चोरटा आज पुन्हा रुईकर कॉलनी येथे येणार असुन व तो परत त्याच पध्दतीचा गुन्हा करण्याची तयारीत आहे. अशी बातमी मिळालेने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक ०१/०५/२०२२रोजी दुपारी रुईकर कॉलनी येथे वेषांतर करून सापळा रचुन वॉच करता असताना रुईकर कॉलनी येथील मैदाना शेजारी बातमीदार यांने दिले माहिती प्रमाणे एक इसम विना नंबरच्या हॉरनेट मोटर सायकलवरुन येवुन परत महिलांचा पाठलाग करत असताना गुन्हे शोध पथकाने त्यास पाठलाग करुन शिताफिने पकडून त्यास ताबेत घेतला. त्या वेळी त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे देवु लागला परंतु सखोल चौकशी करून त्याचा अंगझडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये सोन्याचे
मनीमंगळसुत्र मिळुन आले. सदर मंगळसुत्र बाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्यांने आपण काल दिनांक ३०/०४/२२ रोजी एका महिलेच्या गळ्यातील चोरले असलेचे कबुली दिली. त्या वेळी त्यास नांव पत्ता विचारता त्यांने आपले नांव प्रफुल्ल प्रकाश मांडवेकर वय ३० रा. देवांग समाज, साळशिंगे रोड विटा ता. खानापुर जि.सांगली असे असल्याचे सांगितले.
त्याचेकडुन १ तोळे वजनाचे मंगळसुत्र गुन्हयातील वापलेली मोटरसायकल व त्याचे अंगझडती मध्ये मिळुन आलेला मोबाईल हॅन्डसेट असा सुमारे ९५,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. सदर आरोपी कडुन आणखीण जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अटक आरोपी यास मा. हुजुर न्यायालयात हजर केले असता त्यास मा. न्यायालयाने दिनांक ०५/०५/२०२२ पर्यत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक सो, कोल्हापूर मा अपर पोलीस अधिक्षक सो,कोल्हापूर, उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग कोल्हापूर पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शाहुपुरी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख श्रीकांत इंगवले सहा. पोलीस निरीक्षक, पोहेकॉ ऋषीकेश पवार, पो ना युवराज पाटील, मिलिंद बांगर, पोकॉ लखन पाटील, शुभम संकपाळ, सागर माने, राहुल कांबळे यांनी केली आहे.