Share Now
Read Time:1 Minute, 17 Second
कोल्हापूर प्रतिनिधी दि. २१ : व्यापार-व्यवसाय करताना सराफ व्यावसायिकांना येणाऱ्या समस्या-अडचणींचे निराकरण करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करू, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिले.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाला श्री. गांधी यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. सराफ संघाच्या नवीन पदाधिकाऱ्यांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव प्रीतम ओसवाल, तेजस धडाम, संचालक विजयकुमार भोसले, संजय रांगोळे, अशोक ओसवाल, शिवाजी पाटील, शीतल पोतदार यांच्यासह चेंबर्सचे संचालक राहुल नष्टे आदी उपस्थित होते.
Share Now