विशेष वृत्त जावेद देवडी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मेन अँड उमेन रायफल असोसिएशन व कोल्हापूर महपालिकेच्या वतीने नेमबाजी प्रशिक्षण शिबिर छत्रपती संभाजीराजे नेमबाजी प्रशिक्षण केंद्र दुधाळी येथे दिनांक २१ मे पासून सुरू करण्यात आले.
सदर शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून शाशिरज पाटोळे (पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम ब्रांच) व मा. दत्तात्रय नाळे (पोलीस निरीक्षक, जुना राजवाडा पोलिस स्टेशन) यांची प्रमुख उपस्थिती होती. अजित खराडे, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा मेन अँड उमेन रायफल असोसिएशन यांनी पाटोळे साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.असोसिएशन च्या उपाध्यक्षा सौ कल्पना कुसाळे यांनी दत्तात्रय नाळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आंतररष्ट्रीय नेमबाज व प्रमुख प्रशीक्षक रमेश जयसिंह कुसाळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात नेमबाजी क्षेत्राचा आढावा घेतला. नाळे साहेबांनी आपल्या भाषामध्ये प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. संतोष जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदरचे शिबिर हे दिनांक २१ ते २६ मे पर्यंत पर पडणार आहे. या शिबिरात तेजस रमेश कुसाळे( आंतररा्ट्रीय नेमबाज व प्रशिक्षक), कल्पना कुसाळे (प्रशिक्षक ) स्नेहा कुसाळे(प्रशिक्षक) शिवतेज खराडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबिरास सुमारे ६०ते ७० प्रशिक्षणार्थीनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सदर शिबिराचा समारोप दिनांक २६ मे रोजी होणार आहे.