महाविकासआघाडी ला धक्का देत भाजप ने केला चमत्कार…!

Media Control Online

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित दहा जागांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमश्या पाडवी, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर, भाजपचे उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रवीण दरेकर हे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेस उमेदवार भाई जगताप आणि भाजप उमेदवार प्रसाद लाड यांच्यात दहाव्या जागेसाठी कांटे की टक्कर मानली जात होती. मात्र निकालाला अनपेक्षित कलाटणी मिळाली आणि सेफ मानले जाणारे काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले. तर भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसच्या भाई जगताप या दोघांनीही विजयाचा गुलाल उधळला. या निकालामुळे राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेवरही पुरेसे संख्याबळ नसताना भाजपने विजय खेचून आणल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात असून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी करिष्मा केल्याचं पाहायला मिळत आहे.

Advertisements

ही निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची होती. त्यामुळे सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांचे प्रयत्न, अपक्षांच्या भेटीगाठी सुरु होत्या, तर आमदार फुटू नये यासाठीही संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. यावेळी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांनीही त्यांचे उमेदवार निवडून येण्याचा दावा केला होता.

काँग्रेस उमेदवार भाई जगताप आणि भाजप उमेदवार प्रसाद लाड यांच्यात कांटे की टक्कर मानली जात होती. मात्र निकालाला अनपेक्षित कलाटणी मिळाली आणि काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले. तर भाजपच्या प्रसाद लाड आणि काँग्रेसच्या भाई जगताप या दोघांनीही विजयाचा गुलाल उधळला. या निकालामुळे राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेवरही पुरेसे संख्याबळ नसताना भाजपने विजय खेचून आणल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात असून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी करिष्मा केल्याचं पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *