राजकीय भूकंप Live Updates : शिवसैनिक पदासाठी विकला जाणार नाही : संजय राऊत

Media Control Online 

शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. पदांसाठी आणि सत्तेसाठी विकली जाणारी शिवसेना नाही. शिवसेनेवर वार म्हणजे महाराष्ट्रावर वार आहे. त्यामुळे शिवसेनेत महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद निर्माण होणार नाही. असे जे कोणी निर्माण झाले त्यांची अवस्था तुम्ही पाहातच असाल, असे वक्तव्य करत शिवसेना नेते संजय राऊत  यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १३ आमदारांना घेऊन पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Advertisements

भाजपचा हा घाव छातीवर नाही पाठीवर आहे असे वक्तव्य संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केले. ते म्हणाले यापूर्वी भाजप ने असा डाव केला होता पण तो यशस्वी नाही झाला ह्यावेळी पण त्यांचा डाव असफल ठरणार. बाळासाहेबांची निष्ठा आम्हाला कुणी शिकवू नये. सर्व आमदारांशी लवकरच संपर्क केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *