आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘ कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंद्याकरीता योग शिबिराचे आयोजन…

विशेष वृत्त शिवाजी शिंगे

कोल्हापूर/प्रतिनिधी , दि.२१ : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘ योग फॉर हयुमुनिटी ‘(मानवतेसाठी योग) या थीमवर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंद्याकरीता Art Of living ( व्यक्ति विकास केंद्र , विभाग -सांगली ) या संस्थेच्या वतीने दि.१४-०६-२०२२ ते २१-०६- २०२२ पर्यंत साप्ताहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

Advertisements

सदर योग शिबिराच्या समारोह , आंतरराष्ट्रीय योगदिनी बंदी व कर्मचारी यांच्या कडून विविध प्राणायाम, योगासनं , योगसाधना, योगाभ्यास करून घेऊन, योगाचे महत्व सांगण्यात आले.कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी यावेळी असे प्रतिपादन केले की, ” सध्या जागतिक स्तरावर कोविड मुळे फक्त आपल्या शरीरावरच नाहीतर आपल्या मानसिक आरोग्यवरही खूप जास्त परिणाम झालाय. योग केल्याने फक्त आपले शरीरच निरोगी राहत नाही तर योग मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.” त्यासाठी करा योग,सदैव रहा निरोग..असेही ते पुढे म्हणाले.

सदर योगासन शिबिरात ५७ पुरूष व १९ महिला बंदीनी तसेच २३ अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.संस्थेचे संगीता पाटील,(प्रशिक्षण )दिनेश जाखोठिय्या (स्वयंसेवक) उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *