Share Now
विशेष वृत्त : अजय शिंगे
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक चंद्रमनी इंदुरकर यांची पुणे येथे पदोन्नती झाली आहे.त्यांच्या जागी आलेले कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे यांनी आज पदभार स्वीकारला. कारागृह अधीक्षक चंद्रमनी इंदुरकर यांनी अधीक्षक काळात कारागृह अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले अशा भावना पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.
कोल्हापूर मध्यावर्ती कारागृहचे १८ वे अधिक्षक म्हणून चंद्रमनी इंदुरकर यांनी २५ डिसेंबर २०२० रोजी पदभार स्वीकारला होता. नुकतीच त्यांची पदोन्नती बदली झाली आहे. त्यांच्या बदलीनंतर आता कारागृहाचे १९ वे अधीक्षक म्हणून पांडूरंग भुसारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रमणी इंदूरकर यांनी नवीन कारागृह अधीक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आणि त्यांच्याकडे अधीक्षक पदाची सूत्रे सोपवली.
Share Now