LPG गॅस सिलिंडर किमती मध्ये मोठी कपात….!

MEDIACONTROL ONLINE 

सर्वसामान्य जनतेसाठी जुलै महिन्याची सुरूवात चांगली झाली आहे. केंद्र सरकारने LPG Gas च्या किंमतींमध्ये कपात केली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलो गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये १९८ रुपयांची कपात केली आहे. नवीन किंमती १ जुलै म्हणजेच आजपासून लागू करण्यात आल्या आहेत. इंडियन ऑइल ऑइलचा १९ किलोग्रॅमचा कमर्शिअल गॅस सिलिंडर आता २०२१ रुपयांना मिळणार आहे. याआधी १ जून रोजी किंमतींमध्ये १३५ रुपये कमी करण्यात आले होते. १४.२ किलोच्या घरघुती सिलिंडरच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *