MEDIA CONTROL ONLINE
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना काही तासांतच सुरु होणार आहे. भारताला हा सामना जिंकत ऐतिहासिक विजयाची संधी आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना सर्वात महत्वाचा असेल. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल होऊ शकतात, असे संकेत आता मिळत आहेत.
रोहित शर्मा या सामन्यात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सलामीला कोण येणार, हा प्रश्न भारतीय संघापुढे नक्कीच असेल. सलामीसाठी शुभमन गिलचे स्थान निश्चित समजले जात आहे. पण गिलबरोबर सलामीसाठी आता दोन पर्याय समोर आले आहेत. गिलबरोबर मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा यांना सलामीसाठी संधी मिळू शकते. जर पुजाराला संधी दिली, तर मधल्या फळीत एक अतिरीक्त फलंदाज संघात येऊ शकतो. त्यामुळे मयांकऐवजी पुजाराला सलामीसाठी पाठवण्यात येईल, असे दिसत आहे
भारताचा संभाव्य संघ : जसप्रीत बुमराह (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा/आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि उमेश यादव/मोहम्मद सिराज.