हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले बाबुजमाल दर्गा कोल्हापूर संचालक मंडळाची निवड पार पडली…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : 

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले शहाजमाल मोहल्ला जमियत कोल्हापूर अँड दर्गा ऑफ बाबुजमाल अँड मस्जिद ट्रस्ट कोल्हापूर यांची नवीन संचालक मंडळाची निवड झाली.

या वेळी अध्यक्ष म्हणून अमिन ऊर्फ (बालमभाई) बशीर झारी, उपाध्यक्ष फिरोज इलाई मुजावर, सेक्रेटरी अल्ताफ हबीब मुल्ला, खजानीस अल्ताफ बादशाह मुतवल्ली, संचालक हाजी रशीद महमदहुसैन काझी, संचालक ऐनुद्दीन बाबासाहेब मुल्ला, संचालक हाजी आझाद नबी शेख, संचालक शकील मन्सूर जमादार, संचालक फारुक इकबाल शेख, संचालक युनूस गुलाब पटेल, संचालक अन्सार निजाम पंखेवला यांची निवड करणयात आली.

नूतन अध्यक्ष अमिन झारी यांनी आपल्या मनोगतात गेल्या दोन वर्षात अनेक मोठ्या प्रमाणात करण्यात येणाऱ्या धार्मिक विधी पूर्व कार्यक्रम सर्व सौम्य स्वरूपात घेऊन कोरोना काळामध्ये लॉकडाउनच्या परिस्थितीत ट्रस्टने अनेक सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य व मदत केले आहे इथून पुढे ही सर्व कार्यक्रम उत्साहपूर्वक करणार असून सर्व संचालक मंडळ यांची सहकार्याची आवश्यकता आहे,असे बोलुन सर्व उपस्थितांचे आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *