Weather Updates: राधानगरी धरणातून ११०० क्युसेक विसर्ग…!

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 52 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.०५ :  जिल्ह्यातील राधानगरी धरणात ७५.०४ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, भोगावती नदीवरील- हळदी व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व कुंभी नदीवरील- मांडूकली व शेणवडे असे १४ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणातून १४ हजार १५२ तर अल्लमट्टी धरणातून १२ हजार ६८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४०.८७ दलघमी, वारणा ३२४.३५ दलघमी, दूधगंगा २००.२० दलघमी, कासारी ३०.१६ दलघमी, कडवी २३.९८ दलघमी, कुंभी ३२.४६ दलघमी, पाटगाव ३९.३३ दलघमी, चिकोत्रा १९.४५ दलघमी, चित्री १७.४५ दलघमी, जंगमहट्टी १४.२१ दलघमी, घटप्रभा ३१.९७ दलघमी, जांबरे ८.८६ दलघमी, आंबेआहोळ १८.७९, कोदे (ल.पा) ३.५० दलघमी असा आहे.

   तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम २३.१० फूट, सुर्वे २२ फूट, रुई ४८.६ फूट, इचलकरंजी ४५.६, तेरवाड ३९.८ फूट, शिरोळ २९.९ फूट, नृसिंहवाडी २३.७ फूट, राजापूर .१०.९ फूट तर नजीकच्या सांगली ४.९फूट व अंकली ५.४ फूट अशी आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *