कोल्हापूर प्रतिनिधी, दि.१३ : श्रम फाउंडेशन कोल्हापूर तर्फे महापालिका शाळा नंबर २९ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय जुना बुधवार पेठ कोल्हापूर येथे आज गूरू पौर्णिमनिमित्त गुरुजनाना वंदन करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले,त्या प्रसंगी श्रम फाउंडेशन कोल्हापूर, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कमलाकर सारंग यांनी आपल्या मनोगतात श्रम फाऊंडेशनचे कार्य व उद्दिष्टे बद्दल माहिती सांगितले पुढे त्यांनी बोलताना गुरु पौर्णिमा निमित्त मी ज्या शाळेत विद्यार्थी म्हणून शिकत होतो आज त्या शाळेत आपल्या दैनंदिन मिळकत व खर्चातून बचत करून विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वही कंपास पेटी अंकलपी पाटी व पेन्सिल चे वाटप करताना मला आनंद होत आहे येथून पुढे आमच्या फाउंडेशन तर्फे ग्रामीण भागातील दुर्गम ठिकाणी शाळेची माहिती घेऊन मदत करणार असल्याचे सांगितले
प्रमुख उपस्थितांमध्ये युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी आपल्या मनोगतात आज श्रम फाउंडेशन च्या वतीने घेतलेला कार्यक्रम कौतुकास्पद असून समाजामध्ये सामाजिक जाणीव असलेल्या श्रम फाउंडेशन सारख्यांची गरज आहे आताच्या महागाईच्या दिवसांमध्ये गरीब होतकरू पालकांना आपल्या मुलांना योग्य व चांगला शिक्षण देणे कठीण होत जात आहे अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेची शाळा व जिल्हा परिषद ची शाळा अधिका-अधिक आपल्या गुणवंतात बदल करून विद्यार्थ्यांना शिक्षण देतात अशा प्राध्यापक शिक्षकांचा मला अभिमान वाटतो भविष्यात श्रम फाउंडेशनला सामाजिक उपक्रमात सर्वोतोपरी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य मदत करणार असल्याचे सांगितले व शाळेच्या मुख्याध्यापक /व्यवस्थापक यांना सूचना करताना शाळेसाठी लोकसहभागातून काही उपक्रम व काही मदत लागल्यास जरूर आम्हास कळवावे पत्रकार या नात्याने सर्व स्तरातील लोकापर्यंत आपली माहिती आमच्या प्रसार माध्यमातून पोहोचवण्यात येईल असे सांगून श्रम फाउंडेशन व शाळेने मान्यवर म्हणून बोलवल्याबद्दल धन्यवाद देऊन आभार मानले.
शेवटी श्रीमती आशालता पुंडलिक खाडे मुख्याध्यापिका, मान्यवरांना विनंती करत आपल्या शाळेमध्ये अधिका अधिक विद्यार्थी कशी सहभागी होतील यासाठी मान्यवर म्हणून आपण सर्वांनी सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना आवाहन करावे अशी विनंती करून उपस्थितांचे आभार मानले
यावेळी प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध गायक पी कुमार,सौ.सारिका रमेश पाटील सहा.शिक्षिका,श्री .तानाजी बापूसो इंदूलकर सहा.शिक्षक,सौ.सारिका योगेश कोळी.सहा.शिक्षिका,श्रीम.मालन माजगावकर सेविका,पत्रकार रेणूताई पवार, शाळेचे माजी विद्यार्थी निवास चव्हाण, पवार सर, हेमेंत रुईकर, इ. उपस्थित होते.