कोविड-१९ आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास,सानुग्रह सहाय्यसाठी विहीत मुदतीत अर्ज करणे आवश्यक : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

विशेष वृत्त कौतुक नागवेकर

 सांगली/प्रतिनिधी, दि.१३: कोविड-१९ या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास ५० हजार रूपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याची योजना दिनांक १ डिसेंबर २०१९ पासून ऑनलाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. शासनाच्या दि. ११ एप्रिल २०२२ रोजीच्या परिपत्रकानुसार कोविड-१९ आजारामुळे दिनांक २० मार्च २०२२ पूर्वी मृत्यू झालेला असल्यास दिनांक २४ मार्च २०२२ पासून ६० दिवसाच्या आत म्हणजेच दिनांक २५ मे २०२२ पर्यंत व दि. २० मार्च २०२२ पासून पुढे मृत्यू झाल्यास मृत्यूच्या दिनांकापासून ९० दिवसाच्या आत सानुग्रह सहाय्य योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

Advertisements

            मुदतीच्या नंतरचे अर्ज केवळ गाऱ्हणे निवारण समिती (GRC) मार्फत करता येतील. या योजनेकरीता ज्या अर्जदारांनी सानुग्रह सहाय्यसाठी चुकीचा दावा दाखल केलेला आहे त्यांच्याविरुध्द जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५२ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *