अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण २० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

विशेष वृत्त कौतुक नागवेकर

सांगली/प्रतिनिधी दि. १५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी. इत्यादी व तत्सम नोकरीच्या संधी तसेच ॲप्टीट्यूड टेस्ट आणि इंटरव्ह्यूवर आधारित खाजगी व कॉर्पोरेट क्षेत्रातील चांगल्या नोकरीच्या संधी याकरीता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांच्या पूर्वतयारी करिता नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यात बहुजन हिताय शिक्षण संस्था, गुलाब कॉलनी, सांगली या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधून दि. २० जुलै २०२२ पर्यंत परिपूर्ण अर्ज कागदपत्रांसह सादर करावा, असे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.पात्र युवक युवतींनी https://barti.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून Notice Board च्या सदराखाली बँक, रेल्वे, एल.आय.सी. लिंकवरून अर्ज डाऊन लोड करून किंवा बहुजन हिताय शिक्षण संस्था, गुलाब कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या पाठीमागे, राजर्षी शाहू मार्ग तथा १०० फुटी रोड, दक्षिण शिवाजीनगर, सांगली

Advertisements

मोबाईल क्र. 9422409546/9421151718/ 9867905409/9960304482 या प्रशिक्षण केंद्रातून प्राप्त करून त्या केंद्रावर सादर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *