जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा

विशेष वृत्त कौतुक नागवेकर

सांगली/प्रतिनिधी दि.१५ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने दि. १५जुलै २०२२ रोजी जागतिक युवा कौशल्य दिन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत विजयनगर, सांगली येथे उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सहायक आयुक्त ज.बा.करीम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत होते.  

प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गंत “ किमान कौशल्य विकास कार्यक्रम ” “प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना” ३.० (CCCP), व मुख्यमंत्री महाअरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गंत कार्यरत कौशल्य प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ व इस्लामपूर, ॲक्सिडेंट आर्थोपेडिक हॉस्पिटल, मिरज, डॉ.घाटगे हॉस्पिटल, सांगली या रुग्णालयांचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पाटील, डॉ. प्रकाश गुरव, डॉ. ज्योत्सना बुधगांवकर, डॉ. सानिका प्राणी, डॉ. रोहीणी घाटगे इत्यादी मान्यवर व कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी तसेच स्टार्टअप उभारणीमध्ये योगदान दिल्याबद्दल नेत्रा आर.आय.टी फौंडेशन, राजाराम बापू इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूरचे इन्क्युबेशन मॅनेंजर हर्षल पाटील उपस्थित होते.  

तसेच रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम व रोजगार मेळाव्यात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविलेल्या खाजगी आस्थापना/उद्योजक, भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सांगली, श्री सिध्दीविनायक कॅन्सर हॉस्पिटल, मिरज, सहयाद्री मोटर्स, सांगली, व चिंतामणी मोटर्स, सांगली व उपस्थितांना सहायक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांच्याहस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *